जाहिरात

Sambhajinagar Crime: मुलीचा बोचरा प्रश्न अन् रागात आईने केली हत्या; गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं!

Chhatrapati Sambhajinagar Crime News : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या आईने मुलीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह गादीत लपवून नेण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Sambhajinagar Crime: मुलीचा बोचरा प्रश्न अन् रागात आईने केली हत्या; गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं!

Chhatrapati Sambhajinagar : आपल्या पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह एखाद्या सामानासारखा गादीत गुंडाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्दयी आईला वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. नंदिनी राजू धिवरे (20) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणात आई भारती साबळे, सावत्र वडील आणि मामा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेमप्रकरण आणि बोचरा प्रश्न

नंदिनी गेल्या तीन वर्षांपासून पतीपासून विभक्त होऊन आई भारतीकडे राहत होती. या काळात तिचे कन्नड येथील एका तरुणावर प्रेम जडले. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते, पण आईचा याला तीव्र विरोध होता.19 फेब्रुवारी रोजी दुपारी पुन्हा याच कारणावरून वाद झाला. यावेळी नंदिनीने विचारले, "तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केलं तर दुसरं लग्न करायला काय हरकत आहे?" मुलीचा हा प्रश्न आईच्या मनाला लागला आणि तिने रागाच्या भरात नंदिनीचा रबरी पाईपने गळा आवळून खून केला.

(नक्की वाचा-  कोकणवासियांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून सेवेत; चेक करा वेळापत्रक आणि तिकीट)

गादीत मृतदेह लपवून विल्हेवाट लावण्याचा प्लॅन

हत्या केल्यानंतर भारतीने तिचा पती उमेश साबळे आणि भाऊ अमोल गायकवाड यांच्या मदतीने मृतदेह कन्नड येथील शेतात नेऊन पुरण्याची योजना आखली. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी 'आम्ही घर बदलत आहोत' असा बनाव केला. त्यांनी नंदिनीचा मृतदेह घरातील गादीत गुंडाळला आणि इतर घरगुती सामानासह एका रिक्षामध्ये भरला.

(नक्की वाचा-  VIDEO: "लोक नगरसेवक व्हायच्या आधीच...", मुरलीधर मोहोळांनी स्वत: लावला नगरसेवकाच्या ऑफिसचा बोर्ड)

रिक्षाचालकाची सतर्कता आणि पोलिसांची कारवाई

रात्रीच्या वेळी तिसगाव चौफुली परिसरातून रिक्षा जात असताना, त्यातील संशयास्पद हालचाली आणि वागण्यामुळे रिक्षाचालकाला संशय आला. त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रिक्षा थांबवून तपासणी केली असता, सामानामध्ये लपवलेल्या गादीत नंदिनीचा मृतदेह आढळला. सुरुवातीला आईने मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळल्याचे सिद्ध झाल्याने आईने गुन्हा कबूल केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com