पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा होण्याची मागणी जनसामान्यातून केली जात आहे. दरम्यान नागपूरात घडलेले रितिका मालू प्रकरणही पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या घटनेतील रितिका मालू या आरोपी महिलेला देण्यात आलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे. अन्य प्रकरणांची उदाहरणे देत न्यायमूर्तींनी जामीन देण्याचा अर्ज फेटाळला.
पुण्याच्या अपघातासोबत साधर्म्य सांगणारा एक अपघात याच 25 फेब्रुवारीला नागपुरात झाला होता. 32 वर्षीय मोहम्मद अतिफ आणि 34 वर्षीय मोहम्मद हुसैन हे राम झुल्यावरू दुचाकीने जात होते. त्याच वेळी त्यांच्या मागून एका मर्सिडीजने त्यांना जोरदार धडक दिली. रात्री दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातात मोहम्मद हुसैन हा जागीच ठार झाला. तर मोहम्मद अतिफ याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रितिका मालू आणि माधुरी सारडा या दोघी यावेळी मर्सिडीजमध्ये होत्या. रितीका ही गाडी चालवत होती. यावेळी या दोघींनी मद्यपान केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीतही बाब स्पष्ट झाली होती.
नक्की वाचा - पुण्यातल्या पोर्शे दुर्घटनेची चर्चा पण नागपुरच्या 'त्या' मर्सिडीज अपघाताचे काय?
ही घटना सार्वजनिकरित्या घडली होती आणि त्यात दोघेजण मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पाटील भोसले यांनी हा निकाल दिला आहे. आता आरोपी महिले पुढे दोन पर्याय शिल्लक आहे. एक तर कनिष्ठ कोर्टासमोर किंवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणे किंवा उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल करणे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world