Maharashtra Board HSC 12th Result LIVE: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होतील. शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्ससह विविध लिंक्सवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. त्याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होईल. निकाल लागण्यासाठी अवघे काही तास उरल्याने विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली असून पालकांनाही रिझल्टची उत्सुकता लागली आहे.
HSC Result 2025 LIVE: वैभवी देशमुखचे 12 वी परीक्षेत मोठे यश
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने 12 वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून 85. 13 टक्के मार्क मिळवलेत.
HSC Result 2025 LIVE: बारावीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सोपी पद्धत:
1. सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. तिथे गेल्यावर HSC Examination Result 2025 वर क्लिक करा.
3. समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
4. त्यानंतर सबमीट या बटणावर क्लिक करा
Maharashtra HSC Class 12th Result Live: 12 वीच्या निकालात मुलींची बाजी
या परीक्षेत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागातून विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये यंदा राज्याचा निकाल 91.88 टक्के इतका लागला असून यामध्ये कोकण विभाग सर्वाधिक म्हणजेच 96. 74 टक्क्यांवर आहे. तसेच लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89. 46 टक्के इतका लागला आहे.
Maharashtra HSC Class 12th Result Live: 12 वीच्या निकालाची विभागवार टक्केवारी:
12 वीच्या निकालाची विभागवार टक्केवारी:
कोकण : 96.74 टक्के
पुणे : 91.32 टक्के
कोल्हापूर : 93.64 टक्के
अमरावती : 91.43 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
नाशिक : 91.31 टक्के
लातूर : 89.46 टक्के
नागपूर : 90.52 टक्के
मुंबई : 92.93 टक्के
HSC Result 2025 LIVE: बारावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी
या वर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल आला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा लातूर विभागाचा निकाल लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता तर आत्ता फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला आहे.
HSC Result 2025 LIVE: बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी किती?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी 2025 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 15, 05, 037 विद्यार्थी बसले होते. ज्यामध्ये 8,10348 मुले, 6, 94, 652 मुली आणि 37 तृतीयपंथी होते.
HSC Result 2025 LIVE: निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सोपी पद्धत:
1. सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. तिथे गेल्यावर HSC Examination Result 2025 वर क्लिक करा.
3. समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
4. त्यानंतर सबमीट या बटणावर क्लिक करा
आज बारावीचा निकाल, वर्ध्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
आज बारावीचा निकाल,विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली
वर्धा जिल्ह्यातील 16 हजार 276 विद्यार्थ्यांचे कळणार आज भविष्य
जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रावर 16 हजार 276 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
आज दुपारी 1 वाजताच्या वेळेकडे सगळ्यांचे लक्ष
HSC Result 2025 LIVE: आज लागणार बारावीचा निकाल
'राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. आज इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होत आहे.