जाहिरात
Story ProgressBack

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग

Sahil Khan: मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता साहिल खानवर बेटिंग साइट चालवणे तसेच सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणाच्या केलेल्या तपासामध्ये साहिल खानचे नाव समोर आले होते.

Read Time: 2 min
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग
अभिनेता साहिल खानला अटक

Mahadev Betting App Case: मुंबई क्राइम ब्रांचच्या (Mumbai Crime Branch) एसआयटीने अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) अटक केली आहे. साहिल खानला छत्तीसगड राज्यातील जगलपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता साहिल खानवर बेटिंग साइट चालवण्याचा तसेच सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा गंभीर आरोप आहे. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App Case) प्रकरणाच्या केलेल्या तपासामध्ये साहिल खानचे (Sahil Khan) नाव समोर आले होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

40 तास पाठलाग करून अभिनेत्याला केली अटक

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने साहिलने मुंबईतून पळ काढला. तब्बल 40 तास त्याचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी अखेर साहिलला बेड्या ठोकल्या. तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता, पण याचा काहीही उपयोग झाला नाही.  

(नक्की वाचा: संतापजनक! 12 वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडसह 4 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप, दगडाने ठेचून केली हत्या)

यापूर्वी गुरुवारी (25 एप्रिल) देखील महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App Case) प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) अभिनेता साहिल खानची चार तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार साहिल खान गुरुवारी दुपारी 1 वाजता एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहिला आणि त्याचा जबाब नोंदवून संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास तेथून निघाला. दरम्यान या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नाही, असा दावा साहिलने केला आहे. 

(नक्की वाचा : दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल)

अंमलबजावणी संचालनालय (ED) महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 32 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.  

VIDEO: डरकाळ्या फोडणारा बिबट्या आणि रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination