Mumbai Mayor Expensive Watch: मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या त्यांच्या महागड्या घड्याळामुळे चर्चेत आहेत. रितू तावडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांनी मनगटावर बांधलेले घड्याळ हे तब्बल एक कोटीचे असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. महापौरांचे हे महागडे घड्याळ पाहून नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. अशातच याबाबत आता स्वतः रितू तावडेंनी स्पष्टिकरण दिले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईच्या महापौर रितू तावडे या सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. रितू तावडे यांच्या महागड्या घड्याळावरुन सोशल मीडियावर जोरदाप चर्चा होत आहे. रितू तावडे यांच्या मनगटावर असलेले घड्याळ हे रोलेक्स येलो गोल्ड डायटोना आहे. त्याची किंमत जवळपास ६० ते ७० लाख असून .. भारतातली मार्केट किंमत १ करोड पेक्षा जास्त आहे, असं दावा एका नेटकऱ्याने केला होता.
ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.
— Ritu Tawde (@TawdeRitu) February 26, 2026
माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.
अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.
अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही. https://t.co/QqeuQWze27 pic.twitter.com/JQJlTQCbff
याबाबत आता स्वतः रितू तावडेंनी खुलासा केला आहे. ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असं महापौर रितू तावडेंनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world