जाहिरात
Story ProgressBack

संतापजनक! 12 वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडसह 4 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप, दगडाने ठेचून केली हत्या

Crime News: हे सर्व आरोपी वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करत होते आणि धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एक मुलीचा प्रियकर असल्याचे म्हटले जात आहे.

Read Time: 2 min
संतापजनक! 12 वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडसह 4 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप, दगडाने ठेचून केली हत्या
पोलिसांनी चारही आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना गोंदिया जिल्ह्यामध्ये घडली आहे. एका 12 वर्षीय मुलीवर गँगरेप करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना गोदिंया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यामुळे 17 मेपर्यंत त्यांची रवानगी बाल सुधारगृहामध्ये करण्यात आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दगडाने ठेचून केली हत्या

अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी सांगितले की,  मुलीवर बलात्कार केल्यानंतर आपण पकडले जाऊ यावरून चारही आरोपींमध्ये वाद झाला आणि या वादातूनच त्यांनी पीडित मुलीची दगडाने ठेचून हत्या केली. मृत पावलेली मुलगी इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. 

(नक्की वाचा : दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल)

आरोपींपैकी एकजण मुलीचा प्रियकर  

आरोपी मुलीच्या गावा शेजारील चिल्हाटी गावातील रहिवासी होते. चारही आरोपी बारावी पास आहेत आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करत होते. यापैकी एक तरुणीचा प्रियकर असल्याचेही म्हटले जात आहे.  प्रियकराला भेटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी मुलीला बाइकवरून जंगलामध्ये आणले आणि येथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

(नक्की वाचा : सख्खा शेजारी पक्का वैरी! क्षुल्लक वादाचा असा घेतला बदला की संपूर्ण सोसायटी हादरली)

पोलिसांची सहा पथके करत होती तपास 

नित्यानंद झा यांनी सांगितले की, या घटनेनंतर परिसरातील स्थानिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे.  विविध आदिवासी संघटनांनी जिल्हा दंडाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन बलात्कार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना जंगल परिसरात घडल्याने येथून एखादा साक्षीदार मिळणे किंवा फोन कॉलचे लोकेशन मिळवणे शक्य नव्हते. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा पथके तयार करण्यात आली होती.  40 पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेऊन अखेर हत्येचे गूढ उकलून काढले.  

VIDEO: 26 जुलैचा पूर आणि बाळासाहेब, 'ती' आठवण काढत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना घेरलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination