जाहिरात

Jalgaon News: प्रफुल लोढाला अटक! हनिट्रॅपची पाळेमुळे जळगावपर्यंत? खडसेंच्या आरोपानंतर बडा नेता फसणार?

मुंबई पोलिसांकडून जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली.

Jalgaon News: प्रफुल लोढाला अटक! हनिट्रॅपची पाळेमुळे जळगावपर्यंत? खडसेंच्या आरोपानंतर बडा नेता फसणार?
जळगाव:

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातल्या सेक्स स्कँडलप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.  इतकंच नाही तर ज्यांच्यावर आरोप आहेत ते प्रफुल्ल लोढा भाजपचेच कार्यकर्ते असल्याचा दावा खडसेंनी केला आहे.  प्रफुल लोढांवर मुलींचे अश्लिल व्हिडीओ काढून मुलींना धमकालं जात असल्याचे आरोप आहेत. हेच लोढा भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. त्यामुळे खडसेंच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी भाजपचा एक बडा नेता अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.  

62 वर्षीय प्रफुल लोढांवर नोकरीचे आमिष दाखवून  एका 16 वर्षीय मुलींसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लिल छायाचित्र  काढून, मुलींना लोढा हाऊसमध्ये डांबून त्यांना धमकावल्याचाही लोढांवर आरोप आहे.  अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्रफुल्ल लोढावर पोस्को, बलात्कार, खंडणीसह  हनी ट्रॅपचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढांना पोलिसांनी  अटक केली होती. त्याच्या अटकेमुळे अनेक राज समोर येतील असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.  

नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा

मुंबई पोलिसांकडून जळगावच्या  जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली. लोढा यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत.  प्रफुल्ल लोढाचा मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाने बंगला आहे. नेत्यांवरील गंभीर आरोपांमुळे प्रफुल लोढा चर्चेत होते. 2024 मध्ये लोढांना 'वंचित'कडून  उमेदवारी मिळाली होती. मात्र 5 दिवसातच लोढा याने उमेदवारीतून माघार घेतली. लोढांवर लासलगावमध्ये माजी नगरसेवकाच्या फसवणुकीचा गुन्हा ही दाखल आहे. 

नक्की वाचा - Political news: ठाकरे-फडणवीसांची गुप्त भेट झाली का? फडणवीसांच्या जवळच्या मंत्र्याने सर्वच सांगितलं

प्रफुल लोढांच्या अटकेनंतर याप्रकरणी  आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रफुल लोढांनी बनवलेले अश्लिल व्हिडीओ भाजप वरिष्ठापर्यंत पोहचवून तक्रार केल्याचं खडसेंनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यात सुरु असलेलं सेक्स सँक्डल कुणाच्या आशीर्वादानं सुरु होतं. खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजप वरिष्ठांनी का कारवाई केली नाही. आणि  प्रफुल लोढा कुणाच्या जीवावर अशी गुंडगिरी करत होता? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com