जाहिरात

Honeytrap : फेसबुकवर मैत्री, फार्म हाऊसवर पाठवली मैत्रिणीची मुलगी... वृद्धाबरोबर घडला भयंकर प्रकार

Rajasthan Honeytrap Case: एका 64 वर्षांच्या वृद्धाबाबत भयंकर प्रकार घडला आहे.

Honeytrap : फेसबुकवर मैत्री, फार्म हाऊसवर पाठवली मैत्रिणीची मुलगी... वृद्धाबरोबर घडला भयंकर प्रकार
Honeytrap Case: हनीट्रॅपच्या घटनांनी सध्या परिसरात दहशत पसरली आहे.
मुंबई:

Rajasthan Honeytrap Case: सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून त्याच्या उपयोगाप्रमाणेच त्यामधील धोके देखील वेळोवेळी समोर आले आहेत. 'हनीट्रॅप' हा देखील यापैकी एक धोकादायक प्रकार आहे. ज्याचा फटका सामान्य व्यक्तींपासून संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना बसला आहे. असंच एक धक्कादायक प्रकरण उघड झालंय. यामध्ये एका 64 वर्षीय वृद्धाला सोशल मीडियावर ओळखीच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून 12.90 लाख रुपये उकळण्यात आले. 

या प्रकरणातील हनीट्रॅप गेमची सूत्रधार रेणुका चौधरी पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. तिच्यासोबत आणखी दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे प्रकरण सीकर जिल्ह्यातील धोद पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याआधी लक्ष्मणगढ परिसरातील एका डॉक्टरलाही हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते.

वृद्धाला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवणारी रेणुका चौधरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर खूप सक्रिय आहे. ती स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या सांगून बड्या लोकांसोबतचे आपले फोटो नेहमी पोस्ट करत असते. यात अनेक नेत्यांचे स्वागत करतानाचे फोटोही समाविष्ट आहेत. त्यामुळे लोक तिच्या बोलण्याला सहज बळी पडतात.

( नक्की वाचा : Crime News : आईच्या चेहऱ्यावर ठोसे मारत मुलानं घेतला जीव ! धक्कादायक घटनेचा Video पाहून उडेल थरकाप )
 

आधी मुलगी पाठवली, मग.....

पीडित वृद्धाने हनीट्रॅपची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. तक्रारीत वृद्धाने सांगितले की, फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख रेणुका चौधरीशी झाली होती. रेणुकाने त्यांना अनेकदा व्हिडिओ कॉल केले. रेणुकानेच तिची सहकारी सुबीताच्या मुलीची ओळख त्यांना इंस्टाग्रामवर करून दिली. त्यानंतर रेणुकाने सुबीताच्या मुलीला त्यांच्या फार्म हाऊसवर भेटायला पाठवले. यानंतर पाचच मिनिटांनी रेणुका चौधरी काही लोकांना घेऊन तिथे पोहोचली.

वृद्धाचा आरोप आहे की, या टोळीने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन सोन्याची अंगठी, चेन आणि 25 हजार रुपये घेतले. एवढेच नाही तर, स्टॅम्पवर लिहून रेणुकाच्या खात्यात 12.90 लाख रुपये ट्रान्सफर करायला लावले. बदनामीच्या भीतीने त्यांनी रक्कम दिली.

Latest and Breaking News on NDTV

बँक खात्यावर कारवाई

पीडित वृद्धाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हनीट्रॅपची सूत्रधार रेणुकाचे बँक खाते गोठवले आहे. गुप्तहेरांच्या माहितीनुसार, सूत्रधार रेणुका चौधरी आणि तिची सहकारी सुबीताला अटक करण्यात आली आहे. दोन्ही तरुणींना धोद चौकातून अटक करण्यात आले. पकडले गेल्यावर दोन्ही आरोपी आपापले चेहरे लपवताना दिसल्या. एवढेच नाही तर, रेणुका चौधरीने तर अनेकदा पोलिसांसमोर बेशुद्ध झाल्याचे नाटकही केले.

पैसावाले लोक शिकार

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात हनीट्रॅपची प्रकरणे सतत वाढत आहेत. सूत्रांनुसार, जिल्ह्यात अनेक हनीट्रॅप टोळ्या सक्रिय आहेत ज्या तरुणींच्या माध्यमातून पैसावाले आणि भोळ्या-भाबड्या तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी जाळ्यात अडकवतात आणि मग त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ बनवतात. त्यानंतर पीडिताला ब्लॅकमेल करून त्यांच्या खात्यात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायला लावतात. एवढेच नाही तर, रोख रक्कम आणि सोने-चांदीही लुटतात. बदनामीच्या भीतीने अनेक पीडित तर तक्रार घेऊन पोलिसांकडेही जात नाहीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com