PM Modi Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkri) यांच्या नागपूर जवळचा रामटेक हा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे राजू पारवे हे उमेदवार आहेत. उमरेडमधून ते यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी 24 मार्च रोजी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
नरेंद्र मोदी यांची विदर्भातील ही दुसरी निवडणूक सभा आहे. यापूर्वी त्यांनी चंद्रपूरमध्ये सभा घेतली होती. रामटेक, नागपूर आणि भंडारा या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची ही सभा झाली. या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
'बाबासाहेबांचं संपूर्ण संविधान लागू का केलं नाही?'
'बाबासाहेबांचं संपूर्ण संविधान लागू का केलं नाही?'
काँग्रेसनं एक देश, एक कायदा लागू होऊ दिला नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान 70-75 वर्षात देशात लागू झालं नव्हतं. त्याला जबाबदार कोण होतं? काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मोदींनी बाबासाहेबांचं संविधान लागू केलं. संविधान लागू झाल्यानं काश्मीरमधील जनतेला त्यांचा अधिकार प्राप्त झाला.
'काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नापासून वंचित ठेवलं'
'काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नापासून वंचित ठेवलं'
काँग्रेसं बाबासाहेब आंबेडकर यांना भारतत्न पुरस्कारापासून वंचित ठेवलं. भाजपाच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार आल्यावर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. 2014 साली दिल्लीत एनडीए सरकार आलं तेव्हा दलित व्यक्ती राष्ट्रपती झाला. एनडीए सरकारमुळेच आदिवासी महिला देशाची राष्ट्रपतीपदी विराजमान झाली.
'इंडी आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा द्या'
'इंडी आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा द्या'
यंदा रामनवमीला अयोध्येत रामलल्ला तंबूतून नाही तर भव्य मंदिरातून दर्शन देणार. 500 वर्षांनंतर हा क्षण आला आहे. त्याचा महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आनंद होत आहे. पण, प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण इंडी आघाडीच्या नेत्यांनी धुडकावून लावलं. हे विसरु नका. हे लोकं सनातन धर्माचा अपमान करतात. सनतानचा अपमान करणाऱ्या नेत्यांसोबत सभा घेतात. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या इंडी आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा जिंकू देऊ नका. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा द्या.
विरोधकांकडे नवे मुद्दे नाहीत
विरोधकांकडे नवे मुद्दे नाहीत
विरोधकांकडे प्रचारासाठी नवीन मुद्दे नाहीत. सविंधान धोक्यात हा विरोधकांकडून खोटा प्रचार. इंडी आघाडी देशातील लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावतायत. महाराष्ट्रातील लोकांना, देशवासियांना माझं आवाहन आहे, एकजूट होऊन देशासाठी मतदान करा.
मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
'नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं प्रमाण वाढलं तर निकाल समजून घ्या. फिर एक बार... जेव्हा ही मंडळी माझ्या स्वर्गीय आई-वडील यांना शिवीगाळ करता तेंव्हा निकाल समजून घ्या. EVM वर त्यांनी प्रश्न उपस्थित केला तर निकाल समजून घ्या... फिर एक बार मोदी सरकार'
मोदींकडून मराठीत भाषणाला सुरुवात
मोदींकडून मराठीत भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमधून त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. 'रामटेकच्या पावन भूमीला माझा साष्टांग नमस्कार' या वाक्यानं त्यांनी भाषण सुरु केलं.
गडकरींच्या जिल्ह्यात मोदी काय बोलणार? निवडणूक प्रचार सभेकडं सर्वांचं लक्ष
गडकरींच्या जिल्ह्यात मोदी काय बोलणार? निवडणूक प्रचार सभेकडं सर्वांचं लक्ष
रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेच्या ठिकाणी पंतप्रधानांचं आगमन झालं आहे. विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. विदर्भातील सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.