2 months ago

NDTV Marathi Manch: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत राज्याला नवी दिशा देणाऱ्या महिला नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्लेव्हची थीम 'नारी शक्ती महाराष्ट्राची' अशी आहे. महाराष्ट्र घडवणाऱ्या रणरागिणींच्या या भव्य दिव्य महाउत्सवामध्ये राजकारण, उद्योग, प्रशासन, कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज महिला सहभागी झाले आहेत. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स येथे वाचा...
 

Jun 01, 2026 18:40 (IST)

CM Devendra Fadnavis News : "राज्यात जास्तीत जास्त लखपती दीदी करायच्या"

"मला असं वाटतं की, ही योजना केवळ कोणाला पैसे देण्यापुरती मर्यादीत नाही आहे. तर महिलांच्या सन्मानाशी जोडलेली आणि महिलांना बळ देणारी, अशाप्रकारची योजना आहे.म्हणून मला असं वाटतं की, निश्चितपणे या योजनेचं यश तर आहेच.केवळ महिलांना आम्ही 1500 रुपये आता देतोय. पुढे 2100 रुपये देऊ.याच्याने त्यांचं सर्व चांगलं होईल,असं नाहीय.म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की, राज्यात जास्तीत जास्त लखपती दीदी करायच्या. मला सांगताना असं वाटतं की, जवळपास आम्ही आता 50 लाखांचा टप्पा गाठत आहोत.आमच्या राज्यातील 50 लाख बहिणी या लथपती दीदी झालेल्या आहेत.एक दोन लाख इकडे तिकडे असतील",अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Jun 01, 2026 17:07 (IST)

Ritu Tawade News : ...तोपर्यंत आपण मुंबईच्या महापौरपदाला न्याय देऊ शकत नाही. - रितू तावडे

मुंबईचं महापौरपद मिळाल्यावर केवळ केबिनमध्ये बसून काम होणार नाही, लोकांशी चर्चा करीत नाही तोपर्यंत आपण मुंबईच्या महापौरपदाला न्याय देऊ शकत नाही. - रितू तावडे 

Advertisement
Jun 01, 2026 17:06 (IST)

Ritu Tawade News : गेल्या २२ वर्षे केलेल्या कामाचा अनुभव महापौरपदी पाठिशी - रितू तावडे

मी २२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करते. महापौरपदी काम करीत असताना तळगाळात केलेल्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी उभा राहिला.  - रितू तावडे

Jun 01, 2026 17:04 (IST)

Ritu Tawade News : मुंबईची तुंबई होणार नाही असं १०० टक्के सांगू शकत नाही, मात्र...

आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलैची भीती आहे. ही परिस्थिती आता येणार नाही. मुंबईत  अॅडिशनल पंप बसवण्यात आले आहेत. नालेसफाई पूर्ण झालेली आहे. मुंबईची तुंबई होणार नाही असं १०० टक्के सांगू शकत नाही, मात्र मुंबईकरांना यंदा त्रास होणार नाही.- मुंबईच्या महापौर रितू तावडे

Jun 01, 2026 16:08 (IST)

मराठी बोलायला भूमी पेडणेकरला का वाटते भीती? इंटरनेटवरील 'त्या' प्रकारावर अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता (संपूर्ण बातमीसाठी येथे क्लिक करा)

Bhumi Pednekar News: एनडीटीव्ही मराठी मंचच्या विशेष कार्यक्रमात अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या 11 वर्षांच्या अभिनय प्रवासावर, बॉलिवूडमधील पारंपरिक ढाच्यांवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील महिलांच्या भूमिकेवर उघडपणे भाष्य केले आहे.

Jun 01, 2026 15:55 (IST)

Radha Patil Exclusive: 'मी एकटीनेच बदल का करावा? लोकांनीच...' लावणी सादरीकरणाच्या वादावर राधा पाटीलचा थेट सवाल(संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा)

Radha Patil Exclusive: एनडीटीव्ही मराठी मंचच्या 'नारी शक्ती' कार्यक्रमात लावणी कलाकार राधा पाटीलने तिच्या सादरीकरणावर होणाऱ्या अश्लीलतेच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. पारंपरिक लावणीला मिळणारा थंड प्रतिसाद, मैत्रीण हिंदवी पाटीलचे उदाहरण आणि प्रेक्षकांची बदललेली आवड यावर तिने केलेले खळबळजनक वक्तव्य येथे सविस्तर वाचा.

Advertisement
Jun 01, 2026 14:56 (IST)

Pankaja Munde News : पंकजा मुंडे यांचं २०२९ मधील प्लानिंग काय असेल?

राज्यातील राजकारणात राहायला मला आवडतं, त्यामुळे २०२९ मधील प्लानिंग आता सांगता येणार नाही.

Jun 01, 2026 14:53 (IST)

Bhumi Pednekar News: भूमिकांमधून भारतीय नारीचे प्रतिनिधित्व करू शकेन हा प्रयत्न: भूमी पेडणेकर, अभिनेत्री

पहिला सिनेमा असो, 'टॉयलेट एक प्रेमकथा' असो किंवा 'दलदल'; माझा कायम हाच प्रयत्न राहिला आहे की मी माझ्या भूमिकांमधून भारतीय नारीचे प्रतिनिधित्व करू शकेन: भूमी पेडणेकर, अभिनेत्री

Advertisement
Jun 01, 2026 14:52 (IST)

Bhumi Pednekar News: तुमच्याकडे कोणतीही निवड नसते: भूमी पेडणेकर, अभिनेत्री

जेव्हा तुम्ही सिनेमाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येता, तेव्हा तुमचा पहिला सिनेमा तुम्हाला निवडतो; तुमच्याकडे कोणतीही निवड नसते: भूमी पेडणेकर, अभिनेत्री

Jun 01, 2026 14:52 (IST)

Bhumi Pednekar News: भूमिकांनीच मला निवडलंय: भूमी पेडणेकर, अभिनेत्री

ज्या पद्धतीच्या भूमिका मी निवडल्या आहेत, त्याबाबत मी पहिले हे सांगू इच्छिते की... खरं तर त्या भूमिकांनीच मला निवडलंय : भूमी पेडणेकर, अभिनेत्री

Jun 01, 2026 14:26 (IST)

NDTV Marathi Manch: मंत्री पंकजा मुंडे लाईव्ह

Jun 01, 2026 14:23 (IST)

शक्ती हेच मुळात स्त्री ऊर्जा आहे- पंकजा मुंडे

महिला असूनसुद्धा 'हे' मिळवलं असं म्हणणारी व्यक्ती त्या महिलेला दुबळी समजत असते. 'नारी शक्ती' यामध्ये शक्तीच्या पुढे नारी लावण्याची गरज नाही. शक्ती हीच नारी आहे. शक्ती हेच मुळात स्त्री ऊर्जा आहे. उलट ज्या शक्तीविना शिवही शव आहे अशी ती शक्ती आहे.

Jun 01, 2026 14:20 (IST)

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी अनेक महिला लायक आहेत- पंकजा मुंडे

अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक महिला आहेत जे या पदासाठी लायक आहेत. त्यांपैकी कुणालाही ही संधी मिळाली तरी मला आनंदच होईल, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. 

Jun 01, 2026 14:18 (IST)

असंख्य महिलांना संधी मिळाली तर संपूर्ण महिलावर्ग सशक्त होईल- पंकजा मुंडे

महिलांचं सशक्तीकरण एका महिलेच्या पदावर निर्भर नाही. असंख्य महिलांना संधी मिळाली तर संपूर्ण महिलावर्ग सशक्त होईल. अनेक महिलांना संधी मिळाली तर मला कुठलंही पद दिलं नसलं तरी आनंदच होईल, असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

Jun 01, 2026 14:17 (IST)

Radha Patil News: अश्लीलतेच्या आरोपांवर राधा पाटीलचे चोख उत्तर; म्हणाली, लोकांना जे आवडतेय तेच मी...(संपूर्ण बातमी वाचण्याासाठी येथे क्लिक करा)

Radha Patil News: एनडीटीव्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमात लावणी कलाकार राधा पाटीलने पंढरपूर येथील राडा, तिच्या लावणी सादरीकरणावरील टीका आणि वैयक्तिक आयुष्यावर खळबळजनक खुलासे केले आहेत. फोटोसाठी चाहत्याने हात कापल्याचा प्रसंग, जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा आणि आगामी सिनेमाची घोषणा याबद्दल तिने दिलेली सविस्तर माहिती येथे वाचा.

Jun 01, 2026 13:40 (IST)

Radha Patil News: डान्सर व्हायचंय हा माझा वैयक्तिक निर्णय : राधा पाटील

खूप मोठा कलाकार व्हायचंय, मला डान्सर व्हायचंय हा माझा वैयक्तिक निर्णय होता,  तेव्हा माझ्या मनातही असे नव्हतं की माझं नाव होईल अचानक नाव झालं आणि आज मी इथे आहे.

Jun 01, 2026 13:13 (IST)

Radha Patil News: पंढरपूरच्या कार्यक्रमातील राड्यावर लावणी कलाकार राधा पाटीलची पहिली प्रतिक्रिया

पंढरपूरच्या कार्यक्रमातील राड्यावर लावणी कलाकार राधा पाटीलची पहिली प्रतिक्रिया

लोकमत मंचच्या कार्यक्रमात राधा पाटील म्हणाली की,  "प्रेक्षकांचे खूप  प्रेम आहे, कधी कधी लोकांना दिसत नाही, स्टेजपर्यंत येणे पॉसिबल होत नाही पब्लिक दूर असल्याने फोटो काढता येत नाही, त्यामुळे चिडचिड होते त्यामुळे ते खुर्ची फेकून मारणार किंवा धक्काबुक्की झाली तर त्यांचा इगो हर्ट होतो, हे असेच काहीसे  त्या दिवशी झालं. तेव्हा खूप राडा झाला आम्हाला पण खूप त्रास झाला. आम्ही व्हॅनिटीमध्ये होतो, व्हॅनिटी आमची पोलीस स्टेशनमध्ये गेली तिथून उतरून आम्ही आमच्या गाडीतून बाहेर आलो.  

Jun 01, 2026 13:08 (IST)

Radha Patil News: तेव्हापासून माझे नाव होऊ लागले: राधा पाटील

लहानपणापासून डान्स ही माझी आवड होती, त्यासाठी मी शिक्षण घेतलेले नाही. छोट्या मोठ्या शोला जाऊन दुसऱ्या मुलींना पाहून मी शिकलेय,माझं इयत्ता 12वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर माझं कोल्हापूर, पुणे असे बाहेरगावी जाणं वाढलं,  माझं नाव होऊ लागलं त्यावेळेस तरुणांनी माझं नावं उचलून धरलं तेव्हा मी माझे कार्यक्रम घेण्यासाठी सुरुवात केली. : राधा पाटील

Jun 01, 2026 13:07 (IST)

लोक किर्लोस्करसोबत जोडले आहेत कारण त्यांचा आमच्यावर विश्वास आहे- रमा किर्लोस्कर

लोक किर्लोस्कर सोबत जोडले आहेत कारण त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड करत नाही.

Jun 01, 2026 12:58 (IST)

किर्लोस्कर ही सध्या ब्रिटनममधील सर्वाधिक पंप निर्मिती करणारी कंपनी - रमा किर्लोस्कर

किर्लोस्कर ही सध्या ब्रिटनममधील सर्वाधिक पंप निर्मिती करणारी कंपनी आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनमधील या क्षेत्रातील तब्बल 80 टक्के बाजारपेठेचा वाटा एकट्या किर्लोस्करकडे आहे.

Jun 01, 2026 12:57 (IST)

किर्लोस्कर पंपांमुळे इजिप्तमध्ये वाळवंटात शेती फुलली- रमा किर्लोस्कर

रमा किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समुहाबद्दल सांगतानी म्हटलं की, किर्लोस्कर समूहाने इजिप्तमधील नाईल नदीच्या परिसरात जवळपास 1 लाख पंपांचा पुरवठा केला आहे. या पंपांच्या कार्यक्षमतेमुळे तेथील तब्बल 2 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. ज्या वाळवंटी भागात शेती करणे अशक्य मानले जात होते, तिथे आज किर्लोस्करच्या तंत्रज्ञानामुळे शेती फुलली आहे. 

Jun 01, 2026 12:56 (IST)

NDTV Marathi Manch Live: लोकांना आमची लावणी आवडतेय: राधा पाटील

लोककलावंत राधा पाटीलने म्हटलं की, "बिग बॉसमध्ये गेल्यानंतर मला खूप लोक ओळखू लागले, भलेही लावणी आमची वेगळ्या पद्धतीने असली तरी पण ती लोकांना आवडते म्हणून आम्हाला कामं मिळत आहेत.  जर लोकांना आवडलं नसतं तर आम्हाला काम मिळाली नसती. लावणी सुधारायची असती तर लोकांनी आम्हाला कामं दिलीच नसती आणि इतक्याही अश्लील पद्धतीने माझा कार्यक्रम नाही."

Jun 01, 2026 12:47 (IST)

NDTV Marathi Manch Live: टेनिसबाबत काय म्हणाल्या ऋतुजा भोसले

Jun 01, 2026 12:46 (IST)

NDTV Marathi Manch Live: तुम्हाला सिद्ध करावं लागतं नंतरच मदत - ऋतुजा भोसले

टेनिस खूप टफ आहे. पण प्रयत्न करत राहा. उशिर झाला असला तरी आता मला सरकारची मदत मिळत आहे. थोडं तुम्हाला सिद्ध करावं लागणार. नंतर तुम्हाला नक्कीच मदत मिळाले असं ही यावेळी बोलताना ऋतुजा भोसले यांनी सांगितलं. 

Jun 01, 2026 12:44 (IST)

NDTV Marathi Manch Live: भारतीय टेनिसपटूंना मदतीची गरज - ऋतुजा भोसले

.टेनिस खेळात मोठा खर्च होतो. सर्वांनाच तो परवडतो असं नाही. टेनिसमध्ये खूप बदल होत आहेत. त्यामुळे भारतीय टेनिस खेळाडूंना संधी आणि मदतीची गरज आहे असं गोल्डन गर्ल ऋतुजा भोसले यांनी सांगितलं. 

Jun 01, 2026 12:29 (IST)

NDTV Marathi Manch Live: दुखापतीने अनेक गोष्टी शिकवल्या - ऋतुजा भोसले

मला खुप  दुखापती झाल्या. माझ्या खांद्याला ही दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तयारी करते. माझ्यात एक शिस्त आहे. त्याची मला खूप मदत मिळते. प्रत्येक फिल्डमध्ये चढउतार असतात. दुखापतीमुळे मला ही त्रास झाला. ते माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण त्यातून ही मार्ग काढला असं ऋतुजा भोसले यांनी सांगितलं. 

Jun 01, 2026 12:17 (IST)

NDTV Marathi Manch Live: टेनिसपटू रुतूजा भोसलेने आपल्या भावना व्यक्त केल्या

NDTV Marathi Manch Live: टेनिस पटू रुतूजा भोसलेने एनडीटीव्ही मराठीच्या नारी शक्ती उत्सवात आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Jun 01, 2026 11:48 (IST)

IPS मोक्षदा पाटील LIVE

ग्रामीण भागातील तरुणींना संधी दिली पाहिजे- मोक्षदा पाटील

Jun 01, 2026 11:46 (IST)

ग्रामीण भागातील महिला पोलिसांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आहे- मोक्षदा पाटील

ग्रामीण भागातील आमच्या महिला पोलिसांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आहे. त्यांना संधी दिली की त्याचं ते सोनं करतात हे माझं निरीक्षण आहे. - मोक्षदा पाटील

Jun 01, 2026 11:42 (IST)

ग्रामीण भागातील तरुणींना संधी दिली पाहिजे- मोक्षदा पाटील

मोक्षदा पाटील, IPS अधिकारीआपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुलींमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आपण त्यांना संधी दिली पाहिजे. मात्र आपण हे फक्त बोलून दाखवतो, प्रत्यक्षात कुठेतरी विसरतो.

Jun 01, 2026 11:24 (IST)

NDTV Marathi Manch Live: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना वगळले गेले - सुप्रिया सुळे

लाडकी बहीण योजनेत निवडणुकी आधी 2 कोटी 46 लाख महिलांना पहिल्यांदा पैसे दिले गेले. त्यानंतर आता 1 कोटी 66 लाख महिलांना पैसे दिले गेले. 80 लाख महिला वगळल्या गेल्या. पण वेबसाईटवर 1 कोटी 12 लाख महिलांनाच योजनेचे पैसे दिले गेले. म्हणजे  1 कोटी 25 महिला कमी झाल्या. हा महाराष्ट्र सरकारचा वेबसाईटवरचा डेटा आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Jun 01, 2026 11:19 (IST)

NDTV Marathi Manch Live: भाजपमध्ये टॅलेंट नव्हतं का असं म्हणावं लागेल - सुप्रिया सुळे

भाजपने काँग्रेसमुक्त केल्यानंतर काही नवीन नेते तयार करतील असं आम्हाला वाटत होतं. पण 12 वर्षात त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच लोक दमदाटी करून त्यांच्या पक्षात घ्यावे लागत आहेत. असं होत असेल तर मला चिंता वाटते भाजपकडे टॅलेंटचं नव्हतं का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

Jun 01, 2026 11:08 (IST)

NDTV Marathi Manch Live: पुणे हे क्राईम कॅपीटल झालं आहे - सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या पोलीसांचा अभिमान आहे. पण त्यांच्या मागे ज्या अदृष्य शक्ती आहेत, त्यावर माझा आक्षेप आहे.  गृहमंत्र्यांचा डेटा सांगतो, देशात क्राईममध्ये पाचव्या क्रमांक पुणे आहे. आज पुणं राज्याचं क्राईम कॅपिटल झाली आहे. त्यामुळे त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला लाज वाटते. याला जबाबदार पुण्याचे कारभारी आहेत. पुण्याच्या कारभाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवा अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

Jun 01, 2026 11:03 (IST)

NDTV Marathi Manch Live: सरकारने आम्हाला सांगितलं एक आणलं दुसरं - सुप्रिया सुळे

आमचं समर्थन नारी शक्ती विधेयकाला आहे. आमचे मतभेद कुठे आहेत,जागा पन्नास टक्के वाढवून असं सरकारने सांगितलं होतं. पण तसं बिलात नव्हतं. आम्हाला सांगितलं एक विधेयकात आणलं दुसरं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Jun 01, 2026 10:57 (IST)

NDTV Marathi Manch Live: इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला विरोध नाही - सुप्रिया सुळे

 NDTV Marathi Manch Live: इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला विरोध नाही असं  सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.   इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला विरोध नाही. ते आमचं विधेयक आहे. आमच्या सरकार वेळी ते विधेयक आणलं गेलं. महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. शरद पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. असं त्या म्हणाल्या. 

Jun 01, 2026 10:38 (IST)

NDTV Marathi Manch Live: नारी शक्ती उत्सवाला सुरूवात, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

NDTV Marathi Manch Live: नारी शक्ती उत्सवाला सुरूवात झाली आहे. या उत्सवाच्या पहिल्या सत्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती आहे.  

Jun 01, 2026 10:34 (IST)

NDTV Marathi Manch Live: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचे आगमन

NDTV Marathi Manch Live: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नारी शक्ती उत्सवाच्या ठिकाणी नुकतेच आगमन झाले आहे. 

Jun 01, 2026 10:33 (IST)

NDTV Marathi Manch Live: नारी शत्ती महाराष्ट्राची

Jun 01, 2026 10:10 (IST)

NDTV Marathi Manch: नारी शक्ती उत्सवाला थोड्या वेळात सुरूवात होणार

NDTV Marathi Manch: नारी शक्ती उत्सवाला थोड्याच वेळात  सुरूवात होणार आहे.  या उत्सवात राजकारण, कला, क्रीडा, प्रशासन क्षेत्रातील दिग्गज महिलांची उपस्थिती असणार आहे.