2 days ago

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी सुधीर सांगळे अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले 11 डिसेंबर रोजी भिवंडीत आल्याची माहिती मिळाली आहे. तिथे आपल्या मित्रांना लपवण्यासाठी जागा शोधत असल्याचं सांगितलं जात आहे. तिथे तो कुणाला भेटला याबाबतचेही अनेक तपशील समोर आली आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्याशिवाय बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थकांकडून मनोज जरांगे, सुरेश धस, अंजली दमानियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Jan 06, 2025 21:45 (IST)

अमरावतीत मौलानाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार

अमरावतीत मौलानाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार

अमरावतीच्या बस स्टँड परिसरात असलेल्या मदरशात शिकत होता मुलगा

मौलाना सलमान मुफ्ती 38 न्यू इस्लामपुरा, बिच्छू टेकडी असे आरोपीचे नाव

यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथून कोतवाली पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Jan 06, 2025 20:58 (IST)

नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट, मार्च 2025 पासून उड्डाणे सुरु होणार

नवी मुंबईचं विमानतळ काही महिन्यातच उड्डाणासाठी सज्ज होणार

मार्च 2025 पर्यंत डोमेस्टिक एअरलाईन सुरु होणार

तर एप्रिल 2025 पर्यंत इंटरनॅशनल एअरलाईन सुरु केली जाणार

नवीन वर्षात सरकारकडून महाराष्ट्रच्या नागरिकांना खास भेट दिली जाणार

Jan 06, 2025 20:09 (IST)

धाराशिवच्या गोरमाळा तांडा भागात गोळीबाराची घटना, कारण अस्पष्ट

धाराशिवच्या गोरमाळा तांडा भागात गोळीबाराची घटना घडली आहे.  पारधी समाजातील तरुणांनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.  हा गोळीबार अंतर्गत वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे.  गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.  

Jan 06, 2025 19:12 (IST)

दोषसिद्ध होईपर्यंत राजीनामा घेणे चुकीचं, अजित पवारांची भूमिका; सूत्रांची माहिती

धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारची ही भेट महत्त्वाची होती. या भेटीमध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना आपली ही भूमिका कळवल्याचे सांगितले जात आहे. दोषसिद्ध होईपर्यंत राजीनामा घेणे चुकीचं असल्याची भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Advertisement
Jan 06, 2025 18:14 (IST)

भाजप आमदार सुरेश धस थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

भाजप आमदार सुरेश धस थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. बीड हत्याकांड आणि एसआयटी तपासाच्या संदर्भात धस घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांच्या नेमणुकीची धस पुन्हा एकदा मागणी करणार.

Jan 06, 2025 18:12 (IST)

मनमाडमध्ये भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडले

भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडले. मनमाडच्या कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील घटना. वैष्णवी केकाण आणि आदित्य सोळसे यांचा जागीच मृत्यू. दोघेही दहावीचे विद्यार्थी.

Advertisement
Jan 06, 2025 18:11 (IST)

संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदारला पोलीस कोठडी. तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.

Jan 06, 2025 18:08 (IST)

'राजीनामा देण्याबाबत चर्चा झाली नाही', अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

अजित पवारांसोबत भेटीनंतर बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, राजीनामा देण्याबाबत चर्चा झाली नाही.  कोणाला काय मागणी करायची लोकशाहीत अधिकार आहे. चौकशी सुरू आहे, त्यात काय समोर येते हे पाहू.  एखाद्या विषयी चर्चा सुरू असताना विनाकरण त्यावर माझं मत मांडणे योग्य नाही.  धस असो की कुणी, त्यांना  त्यांच्या नेत्याकडे मागणी करण्याचा अधिकार आहे. 

Advertisement
Jan 06, 2025 15:50 (IST)

Live Update : एसटी बस सेवा सुरळीत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत केलं आंदोलन

लातूरच्या भडी गावातील एसटी बस सेवा सुरळीत करावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आले आहे. एसटी बस सेवा बंद असल्याने भडी गावातील विद्यार्थ्यांना दैनंदिन शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून निवेदने देऊन सुद्धा एसटी बस सेवा सुरळीत करण्यात आली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांकडून रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आले आहे.

Jan 06, 2025 15:31 (IST)

Live Update : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, 7 जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला

बीजापूरमध्ये जवानांच्या गाडीवर हल्ला

7 जवान शहीद झाल्याची माहिती 

Jan 06, 2025 15:18 (IST)

Live Update : वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठावाड्यात प्रति मोर्चे काढणार; लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा

वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठावाड्यात प्रति मोर्चे काढणार; लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा  

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू झाला आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या विरोधात वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठवाड्यात प्रति मोर्चे काढू असा थेट इशारा राज्य सरकारला दिला आहे. हाके यांच्या इशाऱ्यानंतर वंजारी विरूद्ध मराठा असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Jan 06, 2025 14:55 (IST)

Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या हितेश प्रकाश धेंडे याला 24 तासांच्या आत ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Jan 06, 2025 14:45 (IST)

Live Update : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राइम ब्रान्चकडून मकोका कोर्टात 4590 पानांची चार्टशीट दाखल

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राइम ब्रान्चकडून आज मकोका कोर्टात चार्टशीट दाखल केली. या प्रकरणात 4590 पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली आहे. 

Jan 06, 2025 12:55 (IST)

Live Update : बाळांमध्ये पसरतोय HMPV? भारतातील आतापर्यंतचे तिन्ही रुग्ण वर्षाचेही नाहीत!

आतापर्यंत HMPV चे तीन रुग्ण आढळून आले असून कर्नाटकातील एक रुग्ण 8 महिने, दुसरा 3 महिने आणि गुजरातमधील रुग्ण 2 महिन्याचा असल्याचं समोर आलं आहे. 

Jan 06, 2025 12:52 (IST)

Live Update : कर्नाटकानंतर आता गुजरातमध्येही आढळला HMPV चा रुग्ण, आकडा तीनवर

कर्नाटकानंतर आता गुजरातमध्येही आढळला HMPV चा रुग्ण, आकडा तीनवर 

Jan 06, 2025 12:14 (IST)

Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींना आज न्यायालयात केले जाणार हजर

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार असून त्यांना केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. आज या चार आरोपीची पोलीस कोठडी संपणार असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा आणखी तपास बाकी असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jan 06, 2025 11:56 (IST)

Live Update : वाल्मिक कराडवर 302 चे कलम लावा... सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

'बीडमध्ये झालेली हत्या ही माणूसकीची हत्या आहे. याचसंदर्भात सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आमचा मुद्दा जे फरार आरोपी आहेत त्यांना अटक करावे. चौकशी यासाठी थेट आयपीएस अधिकारी नियुक्त करावे  वाल्मिक कराड यास ३०२ कलम लावावे या सगळ्यांचा बाॅस धनंजय मुंडे आहे त्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Jan 06, 2025 11:55 (IST)

Live Update : भारतात HMPV चा रुग्ण सापडल्याची बातमी येताच शेअर बाजारात जोरदार पडझड..

भारतात HMPV चा रुग्ण सापडल्याची बातमी येताच शेअर बाजारात जोरदार पडझड..

सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला निफ्टी सुद्धा 350 अंकांनी कोसळला

Jan 06, 2025 11:45 (IST)

Live Update : HMPV प्रकरणात आरोग्य विभागाने गाईड लाईन दिले, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर घेणार महत्त्वाची बैठक

HMPV प्रकरणात आरोग्य विभागाने गाईड लाईन दिल्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर घेणार महत्त्वाची बैठक ..

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेणार...

बैठकीत HMPV आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा करणार...

सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत त्यांना चर्चा...

Jan 06, 2025 11:41 (IST)

Live Update : देशात HMPV चा आणखी एक रुग्ण, बंगळुरूतून दुसरा रुग्ण आढळला..

देशात HMPV चा आणखी एक रुग्ण, बंगळुरूतून दुसरा रुग्ण आढळला.. 

Jan 06, 2025 11:30 (IST)

Live Update : धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक घटना, पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी; 4 जणांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 पुरुष एक महिलेचा समावेश आहे. 

वाशी तालुक्यातील बावी पिडीवरील घटना 

शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती 

मध्यरात्री येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल

10 आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jan 06, 2025 11:28 (IST)

Live Update : शिक्रापूर - चाकण मार्गावर भीषण अपघात, एक युवक आणि दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले

- दुचाकीवरून चाललेला एक युवक आणि दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले

- गणेश खेडकर असे मृत युवकाचे नाव.

- लहान चिमुकल्यांना शाळेत सोडवायला निघालेल्यांना शाळेत पोहचण्या गोदरच आपला जीव गमवावा लागला आहे.

- चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत असल्याची स्थानिकांची माहिती 

- पशु खाद्य वाहून नेणाऱ्या ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात

Jan 06, 2025 11:07 (IST)

Live Update : उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याला अभिवादन...

उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याला अभिवादन,...

Jan 06, 2025 11:02 (IST)

Live Update : खासदारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पोलीस निरीक्षकाला पडलं महागात, गणेश मुंडेंची बदली

महामार्ग पोलिसात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गणेश मुंडेंची बदली, खासदारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात

Jan 06, 2025 10:25 (IST)

Live Update : संतोष देशमुख प्रकरणी एसआयटीतील 'त्या' तीन सदस्यांना हटवलं!

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीतील एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे.

Jan 06, 2025 10:04 (IST)

Live Update : भारतात HMPV चा पहिला रूग्ण आढळला, 8 महिन्याची मुलगी संक्रमित झाल्याची माहिती

भारतात HMPV चा पहिला रूग्ण आढळला

8 महिन्याची मुलगी संक्रमित झाल्याची माहिती

बंगळुरूमध्ये आढळला पहिला रूग्ण

बंगळुरूच्या खाजगी रूग्णालयानं ही टेस्ट केली आहे.

खाजगी रूग्णालायचा रिपोर्ट असून सरकारी रूग्णालयानं टेस्ट केली नसल्याचं बंगळुरू आरोग्य विभागाचे म्हणणं आहे. 

चीनमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे

Jan 06, 2025 10:03 (IST)

Live Update : डॉलरच्या तुलनेत रुपयाचा नवा नीचांक, एका डॉलरचा भाव 85 रुपये 82 पैसे

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा नवा नीचांक, एका डॉलरचा भाव 85 रुपये 82 पैसे

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डॉलरचा भाव 85 रुपये 80 पैशावर पोहचला होता, आज हा भाव आणखी वधारला असून तो 85 रुपये 82 पैशावर पोहचला आहे.

Jan 06, 2025 09:10 (IST)

Live Update : मुंबई सीआरझेड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून चौघांना अटक, 18 सरकारी अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स जारी

मुंबई सीआरझेड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून चौघांना अटक, 18 सरकारी अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स जारी

बेकायदा विकासासाठी 100 पेक्षा जास्त खारजमिनींचे नकाशे बदलल्याचा आरोप करण्यात आला असून 

समुद्रालगत असलेल्या मार्वे, मढ आयलंड, वर्सोवा आणि अशा अनेक इकोसेन्सिटिव्ह झोन असलेल्या जागांच्या नकाशात फेरफार करून विकासासाठी जमिनी उपलब्ध करून दिल्याचा आरोप

या घोटाळ्यामधे अनेक शासकीय कर्मचारी, इस्टेट एजन्ट्स आणि कंत्राटदारांचा समावेश असल्याची माहिती

Jan 06, 2025 08:52 (IST)

Live Update : संविधान बचाव जन आक्रोश मोर्चाचे आयोजन, आज दलित संघटना रस्त्यावर उतरणार

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मोर्चा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व दलित संघटना एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी होतील. सकाळी 11 च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होणार आहे. संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलंय.

Jan 06, 2025 08:10 (IST)

Live Update : पालघर जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

पहाटे 4.35 वाजताच्या सुमारास जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के.

भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मागील 2018 पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे थांबलेले धक्के पुन्हा जनवले

Jan 06, 2025 08:01 (IST)

Live Update : त्या 3 वादग्रस्त अधिकाऱ्यांचा एसआयटीमधून पत्ता कट?

खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला. यामुळे खासदारांसह आमदारांनी यावर आक्षेप नोंदविला.याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी 'एक्स' समाजमाध्यमाद्वारे दिली होती. त्यामुळे आता एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले असून केवळ एकच अधिकारी यात सोडल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.

Jan 06, 2025 07:17 (IST)

Live Update : प्रशांत किशोर यांना बिहार पोलिसांनी घेतलं ताब्यात

प्रशांत किशोर यांना बिहार पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jan 06, 2025 07:11 (IST)

Live Update : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीदरम्यान जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपायोजना याबाबतही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

Jan 06, 2025 07:09 (IST)

Live Update : महात्मा गांधींच्या आश्रमाला डिसेंबर महिन्यात 25 हजार पर्यटकांची भेट

वर्ध्यातील महात्मा गांधींच्या आश्रमाला डिसेंबर महिन्यात 25 हजार 118 पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्यात दहा हजारांवर पर्यटकांनी सेवाग्राम आश्रमात भेट दिल्याचे दिसून येत असून जानेवारी महिन्यात पर्यटकांची वर्दळ सेवाग्राम आश्रमात वाढलेली आहे. वर्ध्यापासून पाच किलोमीटर अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे. या आश्रमात शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. त्यासोबतच मोठ्या संख्येने पर्यटकदेखील येताना दिसतात.

Jan 06, 2025 07:05 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील तीनमजली छोट्या मॉलला आग, लाखोंचं नुकसान

छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागातील महावीर घरसंसार या तीनमजली छोट्या मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची राखरांगोळी झाली. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. आधी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. काही क्षणात तिने संपूर्ण मॉलला वेढले. शेजारची दोन दुकाने व एका घरालाही आगीच्या झळा पोहोचल्या. परिसरातील नागरिकांनी तातडीने घरातून लोकांना बाहेर काढल्यामुळे सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. रात्री दोन वाजेपर्यंत अग्निशमन विभागाचे 6 बंब, एका टँकरच्या साह्याने आग विझविण्याचे काम सुरू होते,