Pune News : पानशेत धरणात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, नातेवाईकांकडे सुट्टीत आला होता

सोहनलाल आपल्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी पानशेत येथे आला होता. 10-15 दिवसांपासून तो पुणे परिसरात होता.  मंगळवारी दुपारी तो पानशेत धरण परिसरात आंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्यात बुडाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News : पानशेत धरण परिसरात बुडून 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  राजस्थानमधून सुट्टीसाठी आलेल्या मुलाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू झाला आहे. सोहनलाल लखमाराम रायिका असं मृत मुलाचं नाव आहे. सोहनलाल मूळचा राजस्थानमधील पाली तहसीलचा रहिवासी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोहनलाल आपल्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी पानशेत येथे आला होता. 10-15 दिवसांपासून तो पुणे परिसरात होता.  मंगळवारी दुपारी तो पानशेत धरण परिसरात आंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच हवेली आणि वेल्हे आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोहनलालचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शोध मोहिमेत पोलीस हवालदार युवराज सोमवंशी, मंडल अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांच्यासह आदींनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.

(नक्की वाचा - Education City: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, 5 विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र)

या दुर्दैवी घटनेमुळे पानशेत परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाहुणा म्हणून आलेल्या लहानग्याचा असा मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.  या प्रकरणाचा पुढील तपास वेल्हे पोलीस स्टेशन करत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article