मालेगावातील 15 मासेमाऱ्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका;  तब्बल 16 तासांनंतर बचावकार्याला पूर्णविराम 

अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही मंडळी नदीमध्ये अडकून पडली होती. यानंतर धुळ्याहून SDRF टीमलाही पाचारण करण्यात आलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मालेगाव:

मालेगावमधील गिरणा नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 15 जणांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे. गेल्या 17 तासांहून अधिक कालावधीपासून ही मंडळ नदीत अडकून पडली होती. काल 4 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता मासेमारी करण्यासाठी गेलेले 15 जणं नदीत अडकून पडले होते. त्यांना वाचविण्यासाठी NDRF च्या टीमलाही बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांनाही बचावकार्यात अडथळा येत होता. काल पहाटे चार वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. शेवटी तब्बल 17 तासांहून अधिक काळानंतर वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या त्या 15 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. हेलिकॉप्टरद्वारे तीन रेस्क्यू फेऱ्या पूर्ण करून 15 मासेमाऱ्यांना वाचविण्यात यश आलं आहे.  

नक्की वाचा - घरावर कोसळला 100 Kg चा रिसिव्हर, महिलेचा पाय निकामी; पहाटे 4.30 वा. बदलापुरात नेमकं काय घडलं?

मालेगावच्या सवंदगाव शिवारात गिरणा नदीत काही तरुण मासेमारीसाठी गेले होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही मंडळी नदीमध्ये अडकून पडली होती. यानंतर धुळ्याहून SDRF टीमलाही पाचारण करण्यात आलं होतं. बचावासाठी मालेगाव अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली होती. पाण्यात होड्या सोडून त्यातून तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पहाटे चार वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक पाणी वाढल्याने तरुण अडकले होते. मासेमारी करणं तरुणांचा महागात पडलं आहे. 17 तासांहून जास्त कालावधीनंतर तरुणांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले.