जाहिरात

घरावर कोसळला 100 Kg चा रिसिव्हर, महिलेचा पाय निकामी; पहाटे 4.30 वा. बदलापुरात नेमकं काय घडलं?

या स्फोटात तिघेजणं जखमी झाले असून महिलेचा पाय कायमचा निकामी झाला आहे.

घरावर कोसळला 100 Kg चा रिसिव्हर, महिलेचा पाय निकामी; पहाटे 4.30 वा. बदलापुरात नेमकं काय घडलं?
बदलापूर:

बदलापुरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक (Badlapur MIDC Blast) कंपनीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की साधारण शंभर किलोचा रिअॅक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही.

बदलापुरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास कंपनीत रिअॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली.

नक्की वाचा - गटारी पार्टी जीवावर बेतली; 5 मित्र गाडीसह नदीत बुडाले, एकाचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

हा स्फोट इतका भीषण होता की, रिअॅक्टरसोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एकाच कुटुंबातील एक पुरुष, एक महिला आणि लहान मुलगी असे तिघे जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलंय. तर एकावर बदलापुरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.

महिलेचे दोन्ही पाय निकामी...
साधारण शंभर किलो वजनाचा रिअॅक्टर घरावर कोसळला तेव्हा पहाटे 4.30 वाजले असतील. त्यावेळी या घरातील सर्वजण गाठ झोपेत होते. हा रिअॅक्टर कोसळल्यामुळे महिलेचा एक पाय कायमचा निकामी झाला आहे. याशिवाय तिच्या दुसऱ्या पायालाही मार लागला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com