Palghar Accident News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला,अशी प्राथमिक माहिती आहे.या अपघातात अनिल यशवंत सवरा (वय 28, बोट्याचा पाडा)याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर लक्ष्मण गांगड (वय 28) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप गांगड आणि देवीदास गांगड हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान,खोडाळा-वाडा मार्गावरील गोमघर बनाची वाडी गावाजवळ हा अपघात झाला.या ठिकाणावरून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असूनही अपघातानंतर जखमी तरुण गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते.मात्र खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा 108 रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने जखमींवर उपचारासाठी तब्बल दोन तासांचा विलंब झाल्याने वेळेत मिळाले असते तर जखमीचे प्राण वाचले असते,असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नक्की वाचा >> Sindhudurg News: तारकरली समुद्रात पुण्याच्या तरुणाचा करुण अंत, मित्रही सोबत होता, आईसोबत फोनवर बोलला अन्..
तीन तासांपेक्षा जास्त वेळ मृतदेह रस्त्यावर पडून राहिला अन्..
अपघातानंतर त्या रस्त्याने जाणारे निखिल गारे यांनी स्वतःच्या वाहनातून आणि पोलिसांच्या मदतीने दोन जखमींना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र उपचारादरम्यान त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला.अन्य शासकीय वाहन वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ मृतदेह रस्त्यावर पडून राहिल्यानंतर ग्रामस्थांनी एका वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मृतदेह पाठवला.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यातील महिला वणवण भटकतायत..संसार-प्रपंचासाठी दीड किमीचा प्रवास, 'या' ठिकाणी भीषण पाणी टंचाई
या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अपघातातील मृत तरुणांचे मृतदेह वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.