शुभम बायस्कर, प्रतिनिधी
Lake Drowning Incident In Amravati : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पंधरा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपवर काळाने झडप घातली. फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील घातखेडा बंधाऱ्यात गोडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावात भयंकर घटना घडली. सेल्फी काढण्याच्या नादात एकापाठोपाठ एक अशा चार जणांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये दोन सख्खे भावंड असल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली नरेंद्र जोशी (16) आणि आदित्य नरेंद्र जोशी (12) अशी मृत पावलेल्या सख्ख्या भावंडांची नावं आहेत. या घटनेमुळं संपूर्ण परिसर हळहळला आहे. पायल बबलू पंडित (21), यश गजानन काकणे (13) अशी इतर मृत मुलांची नावं आहेत.
ऐकमेकांना वाचवण्यासाठी गेले अन् काळाने झडप घातली
हे चौघेही खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सुट्टीचा दिवस असल्याने जवळपास 15 मित्र-मैत्रिणी घातखेडा परिसरात स्वयंपाक व जेवण करण्याचा प्लॅन करून गेले होते. त्यानंतर त्यांनी रील्स शूट केल्या आणि फोटोही काढले.तलावाच्या काठावर सेल्फी काढत असताना एक जण पाण्यात पाय घसरून पडला.त्याला वाचवण्यासाठी दुसरा व्यक्ती खाली उतरला. पण तोही पाण्यात बुडाला.तिसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीतील 'तो' अनधिकृत बंगला कोणाचा? एकटी महिला प्रशासनाला भिडली, 7 दिवसांपासून आमरण उपोषण
परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले
एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागून एक असे चौघे पाण्याच्या खोल डोहात गेले. ही साखळी दुर्घटना पाहणाऱ्या उर्वरित मित्रांनी किंकाळ्या फोडल्या पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.दुपारी 2 वाजताच्या दरम्यानही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती शोध व बचाव पथक (DRFT) तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.परिसरातील ग्रामस्थांनीही मदतीसाठी पुढे आवे आणि सर्व चार मृतदेह तलावातून बाहेर काढले.पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.