Dombivli Woman Strike Againts KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून एका महिला आमरण उपोषणाला बसली आहे. ज्योती म्हात्रे असं या महिलेचं नाव आहे. पागडी पद्धतीवरील घराचा मोबदला दिल्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारच्या मोबदला दिला गेला नाही. तसेच संबंधित जागेवर अनधिकृत बंगला उभारण्यात आला आहे. या अनधिकृत बंगल्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या आरोप त्यांनी केला आहे.
ज्योती म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडी परिसरात ज्या ठिकाणी त्यांचे पागडी पद्धतीवरील घर होते ते घर पाडण्यात आले. घरावर जेव्हा कारवाई केली गेली होती,तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यांना मोबदला दिले जाईल,असं आश्वासन दिलं होतं. मात्र आतापर्यंत ज्योती म्हात्रे यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अथवा पर्यायी व्यवस्था देण्यात आलेली नाही. त्याच जागेवर सध्या बंगला उभारण्यात आला असून त्या अनधिकृत बंगल्यावर केडीएमसीकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नक्की वाचा >> Nashik News: तरुणाने लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी जबरदस्तीने केले शरीरिक संबंध, घटस्फोट झाल्यानंतर जे घडलं..
उपोषण करणाऱ्या महिलेच्या प्रकृतीबाबत चिंता
या मागण्यांसाठी त्या गेल्या सात दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित बंगला अनधिकृत असल्याचे मान्य करण्यात आले.मात्र तो खाजगी जागेवर बांधण्यात आला असल्याने तात्काळ कारवाई करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नक्की वाचा >> Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये नागरिक भयभीत, सेंच्युरी ग्राउंडजवळ मोठा अनर्थ टळला, 'त्या' तरुणाला अखेर पकडलं
न्याय मिळत नसल्याची ज्योती म्हात्रेंची तक्रार
तसेच संबंधित बंगला मालकाने बांधकाम नियमित करण्यासाठी केडीएमसीकडे अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कारवाई स्थगित ठेवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे आपल्याला न्याय आणि मोबदला मिळत नसल्याची तक्रार ज्योती म्हात्रेंनी केला असताना दुसरीकडे मात्र अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाहीय. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world