Pune Gas Cylinder Blast Today : पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी एलपीजी गॅस सिलिंडरचा तुडवडा भासत असल्याची माहिती आहे. गॅसच्या तुटवड्याचा फटका संपूर्ण देशाला बसला असून गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच पुण्यातील तळवडे येथील रुपीनगर परिसरात आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.एका दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आगीची घटना घडली. या आगीत एक बस आणि परिसरातील भंगार दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरात एका दुकानात अचानक गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि जवळच असलेल्या भंगार बाजारही जळून खाक केलं.धक्कादायक म्हणजे या आगीत एक खासगी बसही जळाली.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात पुन्हा एका वैष्णवीची आत्महत्या! अवघ्या 8 महिन्यात नवविवाहित महिलेनं जीवन संपवलं, कारण काय?
अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या
आगीचे आणि धुराचे लोट दूरवर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीच्या घटनेची माहिती मिळताच,पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत दोन सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.