जाहिरात

Pune News : पुण्यात पुन्हा एका वैष्णवीची आत्महत्या! अवघ्या 8 महिन्यात नवविवाहित महिलेनं जीवन संपवलं, कारण काय?

पुण्यात पुन्हा एका भयंकर घटनेमुळं खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद परिसरात घडली आहे.

Pune News : पुण्यात पुन्हा एका वैष्णवीची आत्महत्या! अवघ्या 8 महिन्यात नवविवाहित महिलेनं जीवन संपवलं, कारण काय?
Pune Vaishnavi Jamkar Suicide Case
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Crime News Today :  पुण्यात पुन्हा एका भयंकर घटनेमुळं खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वैष्णवी जामकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेनं जीवन संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांकडून छळ होत असून वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरातच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवल्याची  माहिती समोर आली आहे. वैष्णवीचे लग्न अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र लग्नानंतर सासरच्या लोकांकडून मानसिक छळ होत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू,सासरा आणि पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

नक्की वाचा >> Pune News : लग्न जुळवणाऱ्या शादी डॉट कॉमवर महिलेची फसवणूक, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने उडवली होती खळबळ

पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. लग्नानंतर सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला गेला. सासरच्या लोकांकडून मानसिक त्रास आणि पैशांची मागणी होत असल्याचीही माहिती याप्रकरणी समोर आली होती. 
या घटनेनंतर कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, आता या नव्या घटनेमुळं पुण्यात विवाहित महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि कौटुंबिक छळाच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com