देशातील 22 आधिकारी बोगस? पूजा खेडकर प्रकरणानंतर विजय कुंभार यांचा मोठा दावा

विजय कुंभार यांनी म्हटलं की, पूजा खेडकर प्रकरणानंतर अशा अनेक अधिकाऱ्यांची नावे सोशल मीडियावर येत आहेत. सोशल मीडियावर  UPSC FILES नावाची फाईल व्हायरल होत आहेत. त्यात 22 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

ट्रेनी IAS पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्चचिन्ह निर्माण झालं होतं. यानंतर यूपीएससीने पूजा खेडकर यांचं IAS पद रद्द केलं आणि त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल झाला. या प्रकरणानंतर अनेक अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी येऊ लागल्या आहेत, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विजय कुंभार यांनी म्हटलं की, पूजा खेडकर प्रकरणानंतर अशा अनेक अधिकाऱ्यांची नावे सोशल मीडियावर येत आहेत. सोशल मीडियावर  UPSC FILES नावाची फाईल व्हायरल होत आहेत. त्यात 22 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहून या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या अधिकाऱ्यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...)

या 22 अधिकाऱ्यांमध्ये पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील देखील एकूण चार अधिकारी असल्याचा दावा कुंभार यांनी केला आहे. इतकेच नाहीतर हे सर्व आधिकारी राज्यात IAS,IPS आणि IRS म्हणून कार्यरत आहेत.

(नक्की वाचा-  Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट)

या अधिकाऱ्यांनी खोटे जातीचे दाखले, खोटे उत्पन्नाचे दाखले, अपंगत्वाचे दाखले असे दाखले देऊन नोकऱ्या मिळवल्या आहेत. यूपीएससीला याबाबत पत्र पाठवलं आहे. हे एकूणच देशाविरुद्ध युद्ध सुरु आहे. यूपीएससीतून निवडून येणारे देशाच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात. अशा सेवेते कुठल्याही उणीवेला स्थान नाही. याशिवाय यासाठी तयारी केलेल्या पात्र उमेदवारांवर देखील हा अन्याय आहे, असं विजय कुंभार यांनी म्हटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article