जाहिरात

Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट

एका चित्रपटाच्या सेटवरचा हा फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याचे तर्कवितर्क काढले जात आहेत.⁠

Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे या चर्चांना उधाण आले आहे. ज्यामध्ये एका कलाकाराने राज ठाकरेंसारखा हुबेहूब पोशाख परिधान केल्यासारखे दिसत आहे. राज ठाकरेंप्रमाणेच या व्यक्तीने पांढरा सदरा, गळ्यामध्ये मफलर घातल्याचे दिसत आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एका चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.⁠

व्हायरल फोटोमध्ये राज ठाकरे यांच्यासारखीच हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती आपण पाहू शकता. राज ठाकरेंसारखा पेहराव, गॉगल एकूणच त्यांच्यासारखी स्टाइल या कलाकारने कॅरी केली आहे. या कलाकारसोबत प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील दिसत आहे. 

(नक्की वाचा-  महायुतीला मिळणार मनसेची साथ? वरिष्ठ नेत्याचं सूचक वक्तव्य)

राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असेल तर ⁠राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारतंय याची उत्सुतका सर्वांनाच लागली आहे. ⁠चित्रपटामध्ये नेमके कोणता मुद्दा पाहायला मिळणार? कोणकोणते कलाकार असणार? तेजस्विनी पंडित अभिनेत्री, दिग्दर्शक की निर्माती नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. या फोटोमागील गुपित काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

राज ठाकरे साकारणार भूमिका?

राज ठाकरे हे देखील चित्रपटात छोटी भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. चित्रपटाचं नाव काय असेल याबाबत अनेक तर्क लढवले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'येक नंबर' असं या चित्रपटाचं नाव असून शकतं. 

( नक्की वाचा : 'भावानं मागितलं असतं तर सर्व काही देऊन टाकलं असतं,' काय पक्ष आणि चिन्ह, सुप्रिया सुळेंचं उत्तर )

काही दिवसांपूर्वी दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर देखील या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले होते. तसेच राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे सभा पार पडली होती या ठिकाणी देखील चित्रपटासाठी चित्रीकरण करण्यात आले होते. शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळावा, नाशिकमधील मेळावा तसेच मनसेच्या बैठका अशा विविध ठिकाणी सिनेमाचं चित्रीकरण झाल्याची देखील माहिती मिळत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com