Sambhajinagar News: सहलीला जाणाऱ्या 9 मित्रांसोबत नको ते घडलं, 3 जणांचा करुण अंत, 6 जण कसेबसे वाचले

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chhatrapati Sambhaji Nagar Water Drowning News

मोहसिन शेख, प्रतिनिधी 

Chhatrapati SambhajiNagar News Today : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे.आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास टेंभापुरी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलेले हे तरुण मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.वाळूज एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर हा काळाने घाला घातला आहे.एका क्षणात आनंदाच्या सहलीचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले.शैलेश जोगदंड,शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

​पाण्यात उतरले अन् घात झाला; तिघांचा जागीच मृत्यू

​मिळालेल्या माहितीनुसार,रांजणगाव शेणपुंजी येथील वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणारे नऊ मित्र आज सुटीचा आनंद घेण्यासाठी टेंभापुरी धरण परिसरात गेले होते.धरण परिसरात फिरत असताना तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते खोल पाण्यात ओढले गेले. आरडाओरडा झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि उर्वरित सहा मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला,मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या काही मिनिटांत हे तिघेही डोळ्यादेखत अदृश्य झाले.

Advertisement

नक्की वाचा >> Palghar News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! एकाच कुटुंबातील 16 जणांसोबत घडलं सर्वात भयंकर

​अग्निशमन दलाने बाहेर काढले मृतदेह; परिसरात शोककळा

​घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर शैलेश जोगदंड,शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. हे तिघेही 25 ते 30 वयोगटातील तरुण होते. पोट भरण्यासाठी शहरात आलेल्या या कतरबगार तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने वाळूज परिसरात आणि त्यांच्या गावाकडे शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा >> Hingoli News : बाबा महाराज आले अन् चक्क पोलिसांची गाडीच चालवली, बासंबा पोलीस पाहतच राहिले, नेमकं काय घडलं?

​घाटी रुग्णालयात मृतदेह रवाना,पोलिसांचा तपास सुरू

​घटनेचा पंचनामा केल्यानंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह उत्तररक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.उर्वरित सहा तरुण या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनाकडून पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वाळूज पोलीस करत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.