Palghar Accident News Today: पालघर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील एकाच कुटुंबातील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातहून मुंबईकडे येत असताना बसचा टायर फुटल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले
पालघर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला आहे. गुजरातमधील एक कुटुंब आपल्या मुलीला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. गुजरातहून मुंबईकडे येत असताना बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली.
नक्की वाचा >> Hingoli News : बाबा महाराज आले अन् चक्क पोलिसांची गाडीच चालवली, बासंबा पोलीस पाहतच राहिले, नेमकं काय घडलं?
जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले
या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील एकाच कुटुंबातील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
नक्की वाचा >> Mumbai-Pune Missing Link: महाराष्ट्रदिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन, कोणत्या वाहनांना मिळणार प्रवेश? टोल लागणार का?
मृत आणि जखमी व्यक्तींची नावं आली समोर
पुष्पावेन लाड (वय 60) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात नैनाबेन लाड (52), टिंकल लाड (29), जगदीश लाड (51), हार्दिक लाड (31), धवल लाड (32), विकी प्रजापती (27), त्रिशा लाड (15), जय लाड (20), जयेश प्रजापती (50), प्रवीण लाड (62), गीता प्रजापती (50), तेजल प्रजापती (25), श्याम लाड (29), कवण लाड (दीड वर्ष), दर्शन लाड (29) हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना डोक्याला, हात-पायांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world