पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जात आहे. 27-28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून हा मेगाब्लॉक सुरू झाला आहे. तर 5-6 ऑक्टोबरपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू राहाणार आहे. या मेगाब्लॉक मुळे पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांचे मेगाहाल होण्याची दाट शक्यता आहे. येवढा मोठा मेगाब्लॉक का घेण्यात आला आहे याचे कारण आता समोर आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका होणार आहे. या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी हा जंम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 4.5 किलो मिटर लांबीची सहाव्या मार्गीकेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी हा मेगाब्लॉक असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. या मेगाब्लॉकचा लोकल सेवेवर परिणाम होणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द ही करण्यात आल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
या 35 दिवसांत 5 व्या, 12 व्या, 16 व्या, 23 व्या आणि 30 व्या दिवशी जवळपास 10 तासांचे ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत जवळपास 140 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर 40 लोकल सेवा या काहीअंशी रद्द करण्यात येणार आहेत. तर आठवड्याच्या शेवटी 80 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर 70 लोकल या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या दहीहंडी, गणेशोत्सव यामुळे लोकलला मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता या ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असले तरी गणेशोत्सवात रेल्वेने विशेष निर्णय घेतला आहे. गपणेशोत्सवातील 7 ते 17 सप्टेबर दरम्यान नव्या मार्गिकेचे कोणतेही काम केले जाणार नाही. त्यावेळी लोकस सेवा नियमित आणि नियोजित वेळापत्रका प्रमाणे चालेल असेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - राज्यातील 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार, वाचा सरकारचा मास्टरप्लान
पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे लोकल सेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळेल. वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव या नऊ किलोमिटरच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसरा टप्पा हा गोरेगाव ते कांदिवली दरम्यानचा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कांदिवली ते बोरीवलीचे काम हाती घेतले जाणार आहे. हा मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वेवर लोकलची संख्या वाढण्यास मदत होईल.