जाहिरात

सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या या घरांच्या किंमतीकडे. या अर्जामध्ये त्या किंमतीही दिल्या आहेत. किंमती पाहील्यानंतर किती जणांचे स्वप्नातल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार याचाच विचार अनेक जण करत आहेत.

सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
नवी मुंबई:

गोपाळकाल्याच्या शुभ मुहूर्तावर सिडको गृहसंकुलांतील उपलब्ध 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा आज कृष्ण जन्माष्टमीला सुरूवात करण्यात आली. त्यातून 900 हून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. ज्यांना ही घरं हवी आहेत त्यासाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या या घरांच्या किंमतीकडे. या अर्जामध्ये त्या किंमतीही दिल्या आहेत. किंमती पाहील्यानंतर किती जणांचे स्वप्नातल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार याचाच विचार अनेक जण करत आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सोमवार, 27 ऑगस्ट 2024 रोजी सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलांतील एकूण 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. एकूण 902 सदनिकांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील 213 आणि सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती व वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील 689 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचं बक्षीस

सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. या वर्षीच्या गोपाळ काल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध 213 सदनिकांपैकी 38 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 175 सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहा-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील उपलब्ध 689 सदनिकांपैकी 42 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता, 359 सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता, 128 सदनिका मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि 160 सदनिका या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत. 

नक्की वाचा - Railway Recruitment 2024: रेल्वेत होणार 14 हजार जागांची भरती, कशी मिळवणार नोकरी? A to Z माहिती

योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 27 ऑगस्ट 2024 पासून प्रारंभ झाला आहे. योजनेकरिता संगणकीय सोडत 10 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीकरिता तसेच योजनेच्या सविस्तर माहितीकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - राज्यातील 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार, वाचा सरकारचा मास्टरप्लान 

मात्र सर्वांचे लक्ष लागले होते ते या घरांच्या किंमतीकडे लागले होते. त्यातील खारघर इथे असलेल्या सर्वात महागड्या घरातची किंमत ही  1 कोटी 13 लाख रूपये आहे. तर खारघरमध्येच 66 लाखातही घर उपलब्ध होणार आहे. घणसोली आणि कळंबोलीतल्या घराच्या किंमती या 37 लाख, 46 लाख आणि 26 लाख आहेत. मागील लॉटरीच्या तुलनेत यात सरासरी दहा लाखांची वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचं बक्षीस
सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
Jaideep Apte sculptor of statue of Chhatrapati Shivaji Maharaj expressed his fear 8 months ago
Next Article
शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?