मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा (Dahihandi) उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई या परिसरात सर्वाधिक थराची दहीहंडी लागली जाते. त्यामुळे याकडे गोविंद गोपाळांचं खास लक्ष असतं. येथे अनेक ठिकाणी लाखोंची बक्षीसं जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज दिवसभरत मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळेल.
मुंबई आणि ठाण्यात 1354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर 50 फूट उंचीच्या दहीहंडीचा रेकॉर्ड आहे. चीन आणि स्पेनच्या गोविंदा पथकांची रेकॉर्डसाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यावर्षीही जय जवानच्या गोविंदा पथकाकडे रेकॉर्डसाठी लक्ष लागले आहे.
नक्की वाचा - Railway Recruitment 2024: रेल्वेत होणार 14 हजार जागांची भरती, कशी मिळवणार नोकरी? A to Z माहिती
ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. भाजप, मनसे, शिंदेसह सर्वच पक्षांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे. त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world