राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यात चार परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या पथकाने आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या चार जणांमध्ये दोन महिलांसह चार रोहिंग्या व्यक्तींना बेकायदेशीरपणे देशात वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेले हे चौघे गेल्या 8-10 वर्षांपासून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते. चिंचवड पोलीस आणि एटीएसने शनिवारी चौघांना ताब्यात घेतले.
( नक्की वाचा : मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड )
शाहिद शेख आणि मुजम्मिल मोहम्मद अमीन खान 2015 पासून भारतात वास्तव्यास आहेत. साजिदा कासिम शेख आणि शफीका मुजम्मील अमीन खान 2012 पासून देशात राहत होते.
(नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं)
पुणे पोलसांनी काही कागदपत्रे जप्त केली आहेत. हे सगळे म्यानमारचे नागरिक आहेत. याप्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांवर परदेशी कायदा आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.