Pune News: खडकवासला धरणातून 45 हजार क्युसेक विसर्ग, एकतानगरीत पूरस्थिती, 'या' सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी

खडकवासला धरणातून तब्बल 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होताच सिंहगड रस्त्यालगतच्या एकतानगरी परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Khadakwasla Dam Overflow

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Khadakwasla Dam Overflow :  खडकवासला धरणातून तब्बल 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होताच सिंहगड रस्त्यालगतच्या एकतानगरी परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली.द्वारका,जलपूजन आणि आनंद पार्कसह अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची मोठी धावपळ उडाली.धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर या परिसरातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरण्याची समस्या दरवर्षी उद्भवते. त्यामुळे वाहनांचे नुकसान,विद्युत उपकरणे निकामी होणे आणि लाखो रुपयांची आर्थिक हानी नागरिकांना सहन करावी लागते.

द्वारका, जलपूजन सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरले पाणी

सकाळी वाढलेल्या पाणीपातळीमुळे द्वारका आणि जलपूजन सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले,तर आनंद पार्कसह परिसरातील अनेक रहिवाशांनी वाहने आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ केली.शिवणे येथील भीमनगर परिसरातील काही घरांमध्येही पाणी शिरल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पावसाळ्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन घटनास्थळी भेट देऊन पाहणी करतात.पंचनामे केले जातात आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची आश्वासने दिली जातात.मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Ruchika Singh : PM नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरणं तरुणीला भोवलं, CJP आणि काँग्रेसची प्रतिक्रिया व्हायरल

या भागात पूर संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वी तयार करण्यात आला होता.निविदा प्रक्रियेसह प्रशासकीय हालचालीही झाल्या; मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.त्यामुळे कागदोपत्री निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील दरीमुळे नागरिकांना दरवर्षी पुराच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. पूरस्थितीची माहिती मिळताच महापौर मंजूषा नागपुरे यांनी पहाटेपासून राजपूतनगर, पुलाचीवाडी, निंबजनगर,एकतानगरी आणि विठ्ठलनगर परिसराची पाहणी केली.त्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

नक्की वाचा >> Ruchika Singh : PM नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरणं तरुणीला भोवलं, CJP आणि काँग्रेसची प्रतिक्रिया व्हायरल