जाहिरात

Ruchika Singh : PM नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरणं तरुणीला भोवलं, CJP आणि काँग्रेसची प्रतिक्रिया व्हायरल

दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात रुचिका सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरले होते.याप्रकरणी नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ruchika Singh : PM नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरणं तरुणीला भोवलं, CJP आणि काँग्रेसची प्रतिक्रिया व्हायरल
FIR On Ruchika Singh

Ruchika Singh Latest News :  दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात रुचिका सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरले होते.याप्रकरणी नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सर्वोच्च न्यायालयाची वकील स्मृती सिंह चंदेल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे प्रवक्ता आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार पवन खेडा यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.रुचिका सिंहचा व्हिडीओ विद्यार्थी आंदोलना दरम्यान खूप व्हायरल झाला होता. 

'ही कारवाई बेकायदेशीर..', सौरव दास काय म्हणाले?

रुचिका सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास म्हणाले,"हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.जर अशा भाषेचा वापर केला गेला असेल,जे अपमानास्पद असेल,तर संबंधीत व्यक्ती त्या व्यक्तीविरोधात मानहानीचा दावा दाखल करू शकतात.दरम्यान, आंदोलकांविरोधात क्रिमिनल कारवाई करणे खूप निषेधार्य आहे.अर्वाच्य भाषेबाबत कोणालाही शिक्षा दिली नाही पाहिजे.  ती भाषा योग्य आहे,असं मी म्हणत नाही. भाषा चुकीची होऊ शकते. 

नक्की वाचा >> Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्याला पुराचा तडाखा! 'या' धरणाचे 20 दरवाजे उघडले, 'त्या' गावांना सतर्कतेचा इशारा

कोणालाही अपमानास्पद वाटू शकते.पण अशा लोकांविरोधात क्रिमिनल कारवाई सुरु करण्याचं ते कारण होऊ शकत नाही.यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. माझं तरुणांना आवाहन आहे की,तुमचे शब्द आणि लोकांविरोधात वापरण्यात येणाऱ्या भाषेबाबत सावधान राहा. यावर क्रिमिनल कारवाया करणं चुकीचं आहे.आम्ही पोलिसांनाही म्हणणार की,शांती ठेवा आणि कोणत्याही राजकीय हेतूसाठी तुमच्या शक्तीचा चुकीचा वापर करू नका".

पवन खेडा यांनीही दिली प्रतिक्रिया 

याप्रकरणी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार पवन खेडा यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, अपशब्द बोलणं चुकीचं आहे. जर घरातील मुलं चूकी करत असतील,तर काय गुन्हा दाखल करतात..ती तर एक मुलगी आहे.पण संपूर्ण राइट-विंग इकोसिस्टम तिच्या विरोधात उभा आहे. तिची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com