Pune News : 5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित, सावित्रीबाई फुले विद्यापीठात काय घडलंय? विद्यार्थी रस्त्यावर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कुलगुरू हटवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे.“एक्सीडेंटल कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा” या घोषणेसह विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Savitribai Phule Pune University News Today
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Student Strike Today : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कुलगुरू हटवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे.“एक्सीडेंटल कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा” या घोषणेसह विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी प्रतिनिधींच्या आरोपानुसार, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत मिळालेला तब्बल 62 कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च न करता ठेवण्यात आला आहे. तसेच जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल 90 दिवसांहून अधिक काळ प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

याशिवाय, पीएचडी संदर्भातील समित्या वर्षभरापासून गठित न करणे,प्राध्यापक भरती प्रक्रियेत विलंब,तसेच परीक्षा संचालक आणि अधिष्ठाता यांसारखी महत्त्वाची पदे प्रभारी तत्त्वावर ठेवणे,या मुद्द्यांवरही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कुलसचिव नियुक्तीच्या गोपनीय अहवालाच्या लीकप्रकरणी दोषींवर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा >>Chandrapur News: बाप पोलीस, मुलगी पोलीस अन् तिचा प्रियकरही पोलीस..प्रेमाला विरोध, चंद्रपुरात मोठं हत्याकांड!

कुलगुरूंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

विद्यार्थ्यांनी “कमवा व शिका” योजनेतील मानधन वाढवणे आणि प्लेसमेंट सेल अधिक प्रभावी करण्याची मागणी केली आहे.या सर्व मुद्द्यांवरून कुलगुरूंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

नक्की वाचा >> Beed News: बीड हादरलं! 'या' राज्य मार्गावर घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना, पोलिसांचाही थरकाप उडाला