आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed Car Accident News : बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली.खडीने भरलेल्या भरधाव ट्रकने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला.प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये पती-पत्नी असल्याचे समोर आले होते. मात्र या कारमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत होते, अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे.अपघातात कारचा दरवाज्याचा चक्काचूर झाल्याने दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या अपघातात माय लेकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकूल झालं आहे.

कारच्या इंजिनने पेट घेतला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील आई आणि मुलगा कारमधून बीडच्या दिशेने जात होते. याचवेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकरने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की,कारच्या इंजिनने लागलीच पेट घेतला.दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world