धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमधील 50 तरुण ISIS च्या संपर्कात

Chhatrapati Sambhajinagar : आरोपपत्रातून संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात किमान 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 50 तरुण इसिसच्या (ISIS) संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील हसूल परिसरातील बेरीबाग परिसरातून एनआयएने 35 वर्षीय मोहंमद जोएव खानला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपपत्रातून संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात किमान 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. लिबियातून जगभरात इसिसचे जाळे पसरवणारा मोहंमद शोएब खानने आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. 

(नक्की वाचा- नाशिकमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू)

जोएब त्याच्यासाठी स्लिपरसेल म्हणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोएबच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार केली होती. 

(नक्की वाचा - मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार)

भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कियेत पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब त्या कटाचे मुख्य सूत्रधार होते, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article