किशोर बेलसरे, नाशिक
नाशिकमध्ये कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयशर आणि ब्रिझा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरदार होती की ब्रिझा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिझा कारमधील चौघांचा जागीच मृत्यू तर आयशर चालक देखील जखमी झाला आहे.
( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या मारुती ब्रिजा कारवर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर आयशर टेम्पो चालक फरार झाला आहे. पोलीस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.
(नक्की वाचा - मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार)
मृतांची नावे
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहेमान तांबोळी यांचा समावेश आहे. मयत सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world