Palghar News : मुंबई अहमदाबाद हायवेवरून 600 किलो चांदीची डिलिव्हरी करताना भयानक घडलं, 2 जणांचा जीव गेला अन्..

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Silver Carrying Van Accident News Today
मुंबई:

Silver Carring Van Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 600 किलो चांदी घेऊन जाणाऱ्या या व्हॅनने डिव्हायडरला धडक दिल्यानंतर ट्रेलरलाही जोरदार धडक दिली.दरम्यान,सायरस मेस्त्री यांच्या अपघाती निधनानंतरही चारोटी परिसरातील ब्लॅक स्पॉट हटवण्यात एनएसएआयला (NHAI) अपयश आले असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर आज सकाळी चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला.मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातमधील वापी येथील मोदीसन लिमिटेडकडे 600 किलो वजनाच्या 20 चांदीच्या प्लेट्स घेऊन जाणाऱ्या व्हॅन चा अपघात झाला. या चांदीची  अंदाजे किंमत 17 कोटी 66 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

Advertisement

भीषण अपघातात व्हॅनमधील दोन जणांचा मृत्यू

गुजरातमधील वापीला जाणारी MH-48-BM-3001 क्रमांकाची व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून मुंबई लेनमध्ये आली.त्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरला व्हॅनची जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात व्हॅन मधील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मौल्यवान चांदीचा माल सुरक्षित ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे,अशी माहिती ऑल इंडिया वाहन चालक महासंघाचे प्रवक्ता हर्बन्स सिंग नन्नाडे यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Pune News : लोणावळ्यात पुणे पोलिसांची धडक कारवाई, 'या' ठिकाणी सुरु होता भयंकर प्रकार, स्थानिकांसह पर्यटक भयभीत

चारोटी परिसरातील वाढत्या अपघातांमुळे महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या भागात अनेक ब्लॅक स्पॉट्स असून गेल्या काही महिन्यांत अनेक भीषण अपघात घडले आहेत.विशेष म्हणजे अपघातानंतर मदत करण्याऐवजी माल लुटण्याच्या घटनाही वारंवार समोर येत आहेत.काही दिवसांपूर्वी आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी झाल्यानंतर जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिक आंबे वेचण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.त्यामुळे महामार्गांवर अपघातानंतर सुरक्षा व्यवस्था, तातडीची मदत आणि मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे,असं मृत्युंजय दूत अकील सय्यद यांनी म्हटलं आहे. 

महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान,चारोटी परिसर पुन्हा एकदा अपघातांच्या मालिकेमुळे चर्चेत आला आहे.टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांचाही याच महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता.त्यानंतर महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही.

नक्की वाचा >> Amravati News: 45 अंशात भाजपच्या 'या' मंत्र्याचा शाही दौरा, हेलिपॅड सज्ज, PM मोदींच्या आवाहनाला केराची टोपली

संपूर्ण महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम पूर्ण होऊनही चारोटीसह अनेक धोकादायक ब्लॅक स्पॉट हटवण्यात NHAI प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही .परिणामी वारंवार भीषण अपघात घडत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे,तर अनेक कुटुंबांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघातानंतर मदतकार्याऐवजी माल लुटण्याच्या घटनांमुळेही महामार्ग सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement