जाहिरात

Pune News : लोणावळ्यात पुणे पोलिसांची धडक कारवाई, 'या' ठिकाणी सुरु होता भयंकर प्रकार, स्थानिकांसह पर्यटक भयभीत

पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत मोठी कारवाई करत लोणावळ्यातील कुसगाव परिसरातून मेफेड्रोन (MD) पावडर जप्त केली आहे.

Pune News : लोणावळ्यात पुणे पोलिसांची धडक कारवाई, 'या' ठिकाणी सुरु होता भयंकर प्रकार, स्थानिकांसह पर्यटक भयभीत
Lonavala Crime News Today

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pune Lonavala Crime News Update : पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत मोठी कारवाई करत लोणावळ्यातील कुसगाव परिसरातून मेफेड्रोन (MD) पावडर जप्त केली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 2 लाख 80 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB)आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. योगेश उर्फ सनी उर्फ गोगो दुर्योधन उमक (वय 24,रा. कुसगाव,लोणावळा),रिझवान अली नंदकुंद सिद्दीकी (वय 27,रा.कामत रूम, लोणावळा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि..

कुसगाव येथील रेल्वेच्या मोकळ्या जागेत काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले.पोलिसांनी टाकलेल्या छाप्या दरम्यान आरोपींकडे 26.09 ग्रॅम वजनाची एमडी (मेफेड्रोन) पावडर सापडली,ज्याची किंमत साधारण 2 लाख 60 हजार 900 रुपये इतकी आहे. तसेच,त्यांच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर विक्री आणि सेवनाच्या उद्देशाने हे अमली पदार्थ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नक्की वाचा >> मौनी रॉयने 19 वर्षाची असतानाच घेतला होता 'हा' मोठा निर्णय, वेडीपिसीच झाली होती, जुना व्हिडीओ व्हायरल

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे,पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत,हनुमंत पासलकर,सागर नामदास,तुषार भोईटे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com