जाहिरात

दुष्काळाच्या झळा! द्राक्ष बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता

सोलापुरातल्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने आपल्या द्राक्षाच्या बागेवर कोयता चालवला आहे. प्यायला पाणी नाही तिथे शेतीचं काय? असा प्रश्न करत त्यांनी पोटच्या पोरासारखी सांभाळलेली बाग कोयत्याने जमिनदोस्त केली आहे.

दुष्काळाच्या झळा! द्राक्ष बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता
सोलापूर:

पाण्या अभावी अनेक ठिकाणी दुष्काळाचा झळा सहन कराव्या लागत आहेत. प्यायचे पाणीही लोकांना मिळत नाही. अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. शेतीसाठी पाणी तर दुरच राहीले. अशा वेळी सोलापुरातल्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने आपल्या द्राक्षाच्या बागेवर कोयता चालवला आहे. प्यायला पाणी नाही तिथे शेतीचं काय? असा प्रश्न करत त्यांनी पोटच्या पोरासारखी सांभाळलेली बाग कोयत्याने जमिनदोस्त केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रणजित चौगुले हे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे आठ एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी द्राक्षाची बाग लावली होती. मात्र गावात दुष्काळा सारखी परिस्थिती आहे. गावकऱ्यांना प्यायला ही पाणी नाही. अशी वेळी शेतीसाठी पाणी कुठून आणायचं असा प्रश्न चौगुले यांना पडला आहे. सर्व बाग पाण्या शिवाय सुकून जात आहे. ज्या हाताने पोटच्या मुला प्रमाणे बाग सांभाळली, वाढवली त्याच बागेवर त्याच हाताने कोयता मारावा लागत असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

हेही वाचा - जबरदस्त योगायोग! जुळ्या भावांना मिळाले समसमान गुण

 बागेसाठी मोठा खर्च केला. पण ऐवढा खर्च करूनही पाण्या अभावी हातात काही लागणार नाही. त्यामुळे ती बाग डोळ्या समोर करपताना पाहू शकणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे शेतकरी चौगुले यांनी सांगितले. दुष्काळा सारखी सगळीकडे स्थिती आहे. अशा वेळी सरकारने तातडीने पाऊले उचलून शेतकऱ्याला मदत केली पाहीजे. काही उपाय योजना आखल्या पाहीजे.  शेतकरी जीवंत राहीला पाहीजे. अशा स्थितीत त्याल खऱ्या अर्थाने मदत होण्याची गरज आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Ratan Tata's Last Rites : एक होते टाटा ! देशाचे 'रतन' अनंतात विलीन
दुष्काळाच्या झळा! द्राक्ष बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता
Dashrath Shitole Opens Fire on Two Young Men in Pune Over Land Dispute
Next Article
उद्योजकाचा तरुणावर गोळीबार, पुण्यात चाललंय काय ?