देवा राखुंडे, प्रतिनिधी
द्राक्ष बागांसाठी प्रचलित असणारी एक खोड तंत्रज्ञान आता डाळिंबांमध्ये वापरली जात आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग केला जात असून याला आरटीफिशियल इंटेलिजन्सची जोड दिली जात आहे. त्यामुळे निर्यातक्षम फळांची निर्मिती होणार असून शेतकऱ्याचा एकरी उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे. महाराष्ट्रात डाळिंब फळ पिकात एक खोड तंत्रज्ञान ही पद्धती प्रथमच वापरली जात असून यामुळे महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळू शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे एक खोड पद्धत?
मुळात एक खोड पद्धत ही द्राक्षांमध्ये वापरली जाते. या पद्धतीत झाडाचं मुख्य खोड साधारण चार फुटापर्यंत वाढवलं जातं. त्यानंतर या खोडावरती दोन ओलांडे वाढवले जातात. या ओलांड्यांना पुढे उप फांद्या वाढवल्या जातात. या उपफांद्यावरती काडी धरली जाते. म्हणजेच या काडीवरती फळधारणा होते. या पद्धतीत मजबूत असा तारांचा लोखंडी अँगल वापरून मांडव करावा लागतो. या मांडवावरती झाडांच्या फांद्या वाढवल्या जातात आणि या फांद्यांवरतीच फळधारणा झाल्यामुळे किती फळे ठेवायची कोणती ठेवायची याचा निर्णय शेतकऱ्यांना घेता येतो.
नक्की वाचा - वर्धा पोलिसांमुळे 15 वर्षांनंतर तुटलेलं नातं पुन्हा जुळलं; अनाथ इशाला सापडलं तिचं कुटुंब!
मोजकी फळे ठेवल्यामुळे झाडावरती ती सक्षमपणे पोचली जातात. विशेष म्हणजे बागेत काम करणे शेतकऱ्याला अतिशय सोपं जातं. त्याही पलीकडे जे मुख्य खोड वाढवलं जातं, त्याच खोडामध्ये सर्व अन्नद्रव्य साठवली जातात. ज्यामुळे झाडाच्या वर वाढणाऱ्या फळांचे पोषण हे एक समान होतं. मुळात ही पद्धत द्राक्षांमध्ये वापरली जाते. परंतु बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ही पद्धत आता डाळिंबात वापरली जात आहे. आजपर्यंत डाळिंबामध्ये जमिनीवर दोन किंवा तीन खोड वाढवले जात होते. यावरतीच फळधारणा धरली जात होती. हा प्रकार म्हणजे झुडूप प्रकार होता. झुडूप प्रकारामध्ये फळांना जोपासण्यासाठी आणि वाढवण्यासाठी फांद्यांना फळांचे वजन पेरण्यासाठी बांबूच्या काट्याचा आधार घेत एक तार ओढून त्यावरती ही फळे लटकत बांधली जात होती.
म्हणजे ज्याप्रमाणे टोमॅटोसाठी स्टेजिंग केलं जातं. अगदी तीच पद्धत डाळिंबासाठी वापरली जाते. मात्र एक खोड पद्धतीचा अवलंब डाळिंब पिकात केल्यास कायमस्वरूपी एक लोखंडी चॅनल वापरून द्राक्षाप्रमाणे मांडव तयार करता येईल. याला एक वेळेस खर्च होईल परंतु वर्षानुवर्ष त्यावरती डाळिंबाचे उत्पादन घेता येईल. काही मोजकी फळे ठेवता येतील फळांची निवड करता येईल त्यामुळे निर्यात फळांची निर्मिती होईल. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निर्यात क्षम फळांचे उत्पादन मिळाल्यामुळे त्याच्या फळांना परकीय देशांमध्ये बाजारपेठ मिळेल हा या पद्धतीतील सर्वात मोठा फायदा आहे. शिवाय खोडाचा संगोपन देखील मजबूतरित्या करता येईल. त्यामुळे डाळिंबात येणारी खोडकिड हा प्रमुख रोग शेतकरी आटोक्यात आणू शकतो.
नक्की वाचा - Beed News : HIV अफवेचे बळी, बीडमधील संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत; संतापजनक प्रकार
या तंत्रज्ञानाचा म्हणजेच आरटीपीसीएल इंटेलिजन्सचा वापर केल्यास कोणताही रोग किंवा कीड येण्यापूर्वीच त्याची अधिक माहिती शेतकऱ्याला मिळेल. हवेतील आद्रता जमिनीतील ओलावा जमिनीचा सामु उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण हे सेन्सॉरच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेळीच मिळेल. यामुळे शेतकरी निर्यात क्षम फळाचे उत्पादन घेऊ शकेल आणि त्याचा खर्च देखील कमी करू शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world