Accident News: दिवाळीची खरेदी करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात, पती जागीच ठार, पत्नी जखमी

Accident News: अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विठ्ठलसिंह नरसिंह जारवाल असे आहे, तर त्यांची पत्नी रंजना या गंभीर जखमी झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Accident News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथून दिवाळीची खरेदी करून परतणाऱ्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला धामोरी फाट्याजवळ भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या ट्रॅक्टरने पुढे जाऊन समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ आणखी एका दुचाकीला उडवले, ज्यात त्यावरील दोघेही जखमी झाले आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विठ्ठलसिंह नरसिंह जारवाल असे आहे, तर त्यांची पत्नी रंजना या गंभीर जखमी झाल्या आहेत. दुसऱ्या दुचाकीवरील टापरगाव येथील एकजण आणि एक महिला असे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. परंतु त्यांची नावे कळू शकली नाहीत. जारवाल दाम्पत्य लासूर स्टेशन येथे दिवाळीची खरेदी करून परतत असताना धामोरी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली.

(नक्की वाचा-  Jalna ACB Raid: 'दुनिया सांगे ब्रम्हज्ञान..', लाचखोर आयुक्तांचा धक्कादायक प्रताप, 2 दिवसांपूर्वी काय घडलेलं?)

या धडकेत विठ्ठलसिंह जारवाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर रंजना यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाने अपघातानंतर पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

(नक्की वाचा - Hingoli News: दिवाळी निमित्त ऑनलाइन शॉपिंग द्वारे मागवला वॉटर डिस्पेन्सर, मिळाला मात्र कचरा, पुढे काय घडलं?)

दिवाळीसारख्या सणाच्या काळात अशा प्रकारची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे आणि ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article