Ladki Bahin Yojana: 14 हजार झोलर पुरुषांना नोटीस, दुर्लक्ष केल्यास गुन्हा दाखल होणार

महिला सबलीकरणासाठी युती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माझी लाडकी बहिण योजना आणली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लाडकी बहिण योजना महायुती सरकारने निवडणुकी आधी घाईघाईने राबवली. या योजनेत सर्रास सर्वांनाच पात्र ठरवण्यात आले. शिवाय त्यांच्या खात्यात थेट पैसेही जमा करण्यात आले. मग ते पैसे कुणाला मिळाले याची काही मोजदाद सरकारकडे नव्हती. शिवाय पात्र कोण अपात्र कोण ही तपासणारी तशी सक्षम यंत्रणाही नव्हती. त्याचा गैरफायदा अनेकांनी घेतला. त्यात काही महिला ही होत्या. पण त्या पेक्षा ही भयंकर म्हणजे काही पुरूषांनीही खोट्या कागदपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ घेतला. ही बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. या योजनेचा लाभ पुरूषांनीही घेतल्याचं आता सरकारने मान्य केलं आहे. 

या पार्श्वभूमीवर आता सरकारने कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यातील जवळपास 14 हजार पुरूषांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या खात्यात आतापर्यंत तब्बल साडे एकवीस कोटी जमाही करण्यात आले आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. एकीकडे सरकारवर मोठे आर्थिक संकट असल्याची टीका होता आहे. त्याच विकास कामांवर ही परिणाम होत आहे. अशा वेळी साडे एकवीस कोटी हे पुरूषांनी लाटले आहेत. 

नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुषखबर! रक्षाबंधनाची भेट मिळणार, 'या' दिवशी किती पैसे जमा होणार?

ही बाब सरकारसाठी चांगली नाही. आता ही गोष्टा उघड झाल्यामुळे सरकारने कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे सरकार वसूल करणार आहे. त्यामुळे या 14 हजार लाभार्थी पुरूषांना सरकारने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये या योजने अंतर्गत घेतलेले पैसे परत करण्यास सांगितले आहे. जर हे पैसे एक महिन्यात परत केले नाही तर संबंधीतांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पैकी किती जण सरकारचे हे पैसे परत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप

महिला सबलीकरणासाठी युती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माझी लाडकी बहिण योजना आणली होती. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला होता. या योजनेत  अनेकांनी घुसखोरी केली होती. एकाच महिनेचे अनेक अर्ज आले होते. तर काही पुरूषांनीही अर्ज केले होते. काही अपात्र असलेल्या लोकांनीही या योजनेसाठी सुरूवातीला अर्ज केले. त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र आता त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. 

Advertisement