जाहिरात

Actress Gautami Kapoor: मुलीच्या वाढदिवसाला भेट दिला व्हायब्रेटर, अभिनेत्रीने अभिमानाने सांगितला किस्सा

Ram Kapoor's Wife Gautami Kapoor: गौतमीने केलेल्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

Actress Gautami Kapoor: मुलीच्या वाढदिवसाला भेट दिला व्हायब्रेटर, अभिनेत्रीने अभिमानाने सांगितला किस्सा
मुंबई:

आपल्या मुलाबाळांचा वाढदिवस असतो तेव्हा आपण त्यांना आवडीच्या वस्तू भेट म्हणून देत असतो. काहीजण कपडे भेट देतात, काहीजण खेळणी, कॉम्प्युटर, लपटॉप भेट देतात किंवा काहीजण आपल्या मुलांची आवड काय आहे हे विचारून त्यानुसार गिफ्ट देतात. मुलं कितीही मोठी झाली तर त्यांचे आईवडील त्यांना काहीना काहीतरी भेट देण्याचा प्रयत्न करत असतात.  अभिनेत्री गौतमी कपूर हिने तिच्या मुलीच्या वाढदिवसाला दिलेल्या भेटीबद्दलचा एक किस्सा सांगितला. तिच्या या किश्यावरून सोशल मीडियावर धुमाकूळ माजला आहे. 

( नक्की वाचा: अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या )

अभिनेत्री गौती कपूर हिने एका पॉडकास्टमध्ये म्हटले की, "माझी मुलगी 16 वर्षांची झाली, तेव्हा मला तिला काहीतरी भेट द्यायची होती. मी विचार केला की तिला सेक् टॉय द्यावे का? मी जेव्हा हे तिच्याबरोबर बोलले तेव्हा ती म्हणाली की तुझं डोकं ठिकाणावर आहे ना ? अशा किती आया आहेत ज्या त्यांच्या मुलींना सेक्स टॉय भेट म्हणून देतात? असे प्रयोगतुम्ही का करत नाही ? माझ्या मुलीने सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. अनेक महिलांना या सुखाचा अनुभव घेता येत नाही . आज माझी मुलगी 19 वर्षांची आहे आणि ती आज माझं कौतुक करते. "

गौतमीने केलेल्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. एकाने म्हटले आहे की वाईट गोष्टी करण्यापेक्षा हे कधीही चांगले आहे.
 

दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, भारतीय मंडळी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करू लागली आहे.

तिसऱ्या एकाने म्हटले की गौतमीवर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली पाहीजे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com