जाहिरात

ऐन उन्हाळ्यात वीज बिलात होणार मोठी बचत! सिलिंग फॅनवर मिळणार सवलत, पर्यावरणाचाही होणार फायदा

Adani Electricity :अदाणी इलेक्ट्रिसिटीने वीज वाचवणाऱ्या सिलिंग फॅनवर 50 टक्के सवलतीची विशेष ऑफर आणली आहे.

ऐन उन्हाळ्यात वीज बिलात होणार मोठी बचत! सिलिंग फॅनवर मिळणार सवलत, पर्यावरणाचाही होणार फायदा
मुंबई:

यंदाचा असह्य उन्हाळा सुसह्य करतानाच वीज ग्राहकांची वीज बिले कमी करण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने वीज वाचवणाऱ्या सिलिंग फॅनवर 50 टक्के सवलतीची विशेष ऑफर आणली आहे. ही सवलत घरगुती ग्राहक, शिक्षणसंस्था, रुग्णालये आणि धर्मादाय ट्रस्ट यांना मिळेल. याद्वारे पर्यावरणपूरक जीवनशैली कोणालाही सहजपणे अंगिकारता येईल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे सवलत?

या योजनेमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटीने बजाज, ओरिएंट, सुपरफॅन या कंपन्यांशी भागीदारी करून बीईई 5 तारांकित दर्जा मिळालेले सिलिंग फॅन भरघोस सवलतीच्या दरात मिळण्याची व्यवस्था केली आहे. ही सवलत केवळ मर्यादित काळाकरताच लागू असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ती दिली जाईल. 

कोणत्या पंख्यावर मिळणार उन्हाळी सवलत?

  • बजाज ( रेग्युलर मॉडेल) : सवलतीची किंमत 2,284 रु. (मूळ किंमत 5,500 रु.)
  • ओरिएंट (रेग्युलर आणि डेकोरेटिव्ह मॉडेल) : सवलतीची किंमत 3,049 रु. (मूळ किंमत 5,235 रु.)
  • सूपरफॅन ( रेग्युलर आणि डेकोरेटिव्ह मॉडेल) : सवलतीची किंमत 3,180 रु. (मूळ किंमत 5,000 रु.)

हे पंखे वापरल्यास नेहमीच्या पंख्यांच्या तुलनेत 60 टक्के वीज बचत होते. बजाज, ओरिएंट, सुपरफॅन यासारख्या विश्वासार्ह कंपन्यांच्या पंख्यांच्या मॉडेल मधून निवड करा. 

( नक्की वाचा : अदाणी इलेक्ट्रिसिटीचा अमेरिकेत डंका! मानाच्या 'गोल्ड एचआर एक्सलन्स' पुरस्काराने सन्मान )
 

ही सवलत का चुकवू नये ?

  • पंखे लावल्यावर लगेच तुमचे पुढील बिल कमी आल्याचे दिसून येईल. 
  • प्रदूषणकारी वायू उत्सर्जन घटवून आपली पृथ्वी स्वच्छ होण्यास हातभार लावा. 
  • वीज वाचवणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पंख्यांचा आनंद घ्या 
  • पर्यावरण पूरकतेची हमी 

या उपक्रमामुळे होणारे चांगले परिणाम अधोरेखित करताना अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या प्रवक्त्याने म्हणाले, 'अदाणी इलेक्ट्रिसिटी पर्यावरण पूरकतेशी आणि ग्राहकांचे वीजबिल कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. कमी वीज वापरणारी उपकरणे सवलतीच्या दरात देऊन आम्ही प्रदूषण करणाऱ्या घातक वायूंचे उत्सर्जन 2023 पर्यंत एक अब्ज टनांनी कमी करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. या उपक्रमाचा फायदा सर्वांनाच आहे. यामुळे ग्राहकांना पर्यावरणपूरक उपकरणे निवडून पैसे वाचवणे देखील शक्य होईल.'


हरितक्रांतीमध्ये सहभागी व्हा 

या डिमांड साइड मॅनेजमेंट प्रोग्रामनुसार अदाणी इलेक्ट्रिसिटीने आतापर्यंत 2,225 ऊर्जा-कार्यक्षम पंखे वितरित केले असून आणखी 50 हजार पंखे देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

कसा घेणार फायदा?

या योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीची 24 तास उपलब्ध असलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 19122 वर संपर्क करा. अथवा www.adanielectricity.com  ला भेट द्या.

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: