जाहिरात
This Article is From Sep 13, 2024

अदाणी ग्रुपनं हिंडेनबर्गचे स्वीस अकाऊंटबद्दलचे नवे आरोप फेटाळले

हिंडनबर्गचे आरोप हे बेसलेस असून कंपनीची बदनामी करण्याचा हा पुन्हा एकदा प्रयत्न असल्याचं अदाणी ग्रुपनं पत्रकात म्हटलं आहे.

अदाणी ग्रुपनं हिंडेनबर्गचे स्वीस अकाऊंटबद्दलचे नवे आरोप फेटाळले
मुंबई:

अदाणी ग्रुपनं हिंडेनबर्गचे स्वीस अकाऊंटबद्दलचे नवे आरोप फेटाळले आहेत. स्वीस प्रशासनानं अदाणी ग्रुपचे कुठलेही अकाऊंट फ्रीज केलेले नाहीत. त्याच बरोबर कोर्टाच्या कुठल्याच कारवाईत अदाणी ग्रुपचा उल्लेखही आलेला नसल्याचं स्पष्टीकरण ग्रुपनं दिलंय. स्वीस प्रशासनानं अदाणींशी संबंधीत अर्धा डझनपेक्षा जास्त बँक अकाऊंट गोठवल्याचा आरोप हिंडनबर्ग ह्या शॉर्ट सेलर कंपनीनं केलाय. त्यावर अदाणी ग्रुपनं सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंडनबर्गचे आरोप हे बेसलेस असून कंपनीची बदनामी करण्याचा हा पुन्हा एकदा प्रयत्न असल्याचं अदाणी ग्रुपनं पत्रकात म्हटलं आहे. अदाणी ग्रुपनं स्पष्टीकरण देताना हिंडनबर्गचे आरोप हे बेसलेस असल्याचे म्हटले आहे. शिवाय हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. स्वीस कोर्टातल्या कुठल्याच प्रोसेडिंगमध्ये सहभाग नाही असंही या पत्रात म्हटलं आहे. शिवाय कुठल्याच प्रशासनानं ग्रुपचे कोणतेही अकाऊंट गोठवलेले नाही असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातमी - अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत गॅस गळती

त्याच बरोबर कोर्टाच्या कोणत्याच ऑर्डरमध्ये अदाणी ग्रुपचा उल्लेख नाही असेही सांगण्यात आले आहे. शिवाय ग्रुपकडे कोणतेही  स्पष्टीकरण मागितलेलं नाही. कोणती माहितीही मागितलेली नाही. ग्रुपचे परदेशातले सर्व व्यवहार, स्ट्रक्चर पारदर्शक आहे. सर्व कायद्याचं पालन केलं जात आहे. त्यामुळे संबंधीत आरोप हे निरर्थक, तर्कहीन आणि मुर्खपणाचे आहेत, असं ग्रुपनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. संबंधीत आरोप म्हणजे कंपनीची प्रतिष्ठा आणि मार्केट मुल्यांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अदाणी ग्रुप हा पारदर्शकता आणि कायद्याचं पालन करण्यास कटिबद्ध आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.