'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाडकी मोलकरीण योजनेची तयारी सुरू आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

मध्य प्रदेश सरकारनंतर महाराष्ट्रात राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना राबवली जात असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला ही योजना फायद्याची ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान राज्य सरकारकडून आणखी एका योजनेबाबत चाचपणी सुरू असल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाडकी मोलकरीण योजनेची तयारी सुरू आहे. 

असंघटित कामगार किंवा घरेलु कामगार महिलांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील 10 ते 12 लाख मोलकरणींना याचा फायदा होणार आहे. मात्र नोंदणी केलेल्या घरेलु कामगार, मोलकरणींना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. गृहोपयोगी वस्तू दिल्या तरी घरेलु कामगारांना मदत मिळेल या हेतूने ही योजना राबवण्यात येणार असल्याचं समजते. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

नक्की वाचा - Shivsena Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

लाडकी मोलकरीण योजनेत काय लाभ मिळणार?
- स्वयंपाकघरातील कुकरसह 21 भांड्यांचा दहा हजार रुपयांचा संच