पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC ची सावध भूमिका; फेर पडताळणीला सुरुवात

MPSC News : मुंबई , ठाणे, नाशिक अकोला आणि लातूर येथे ही फेर पडताळणी सुरू आहे. आरोग्य उपसंचालक आजच तपासणीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणार आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

ट्रेनी  IAS पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दिव्यांग कोट्यातून पूजा खेडकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्रचं बोगस असल्याचा आरोप होत आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या या प्रकरणामुळे राज्य लोकसेवा आयोग (MPSC) सावध झाला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अँक्शन मोडवर आलं आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्ग 2 च्या 623 जागांची भरती प्रक्रिया राबवली होती. त्या भरती प्रक्रियेत दिव्यांग आरक्षणातून 9 उमेदवार पात्र झाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार आज फेर पडताळणीला सुरुवात करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- पूजा खेडकरचं UPSC ने तातडीने निलंबन का केलं नाही?, माजी निवडणूक आयुक्तांचं टीकास्त्र)

दोन वेळा आरोग्य तापसणीला गैरहजर असलेले बाळू दिगंबर मारकड हे आज तपासणीला हजर झाले आहेत. बाळू मारकड यांची नाशिकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी झाली आहे. दिव्यांग आरक्षणातून पात्र झालेले बाळू मारकड हे तहसीलदार पदाच्या प्रथम यादीतील उमेदवार आहेत. 

( नक्की वाचा : मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड )

मुंबई , ठाणे, नाशिक अकोला आणि लातूर येथे ही फेर पडताळणी सुरू आहे. आरोग्य उपसंचालक आजच तपासणीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणार आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article