जाहिरात

Mumbai News : रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का? 

 New India Cooperative Bank : बँकेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. सध्या बँकेकडून केवळ लॉकरचे टोकन दिले जात असून ते देखील सर्वांना दिले नसल्याची  ठेवीदारांची तक्रार आहे. 

Mumbai News : रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का? 
New India Cooperative Bank in mumbai

New India Cooperative Bank : आरबीआयने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले. बँकेच्या बहुतांश व्यवहारांवर निर्बंध घातल्याने लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अंधेरीतल्या विजयानगर शाखेसमोर बँकेच्या खातेधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. बँकेतल्या अनियमित्तेवरून गुरुवारी रिझर्व्ह बँकेने बहुतांश व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक रात्रीतून बंद पडल्याची बातमी आल्यानंतर बँकेबाहेर लोकांनी गर्दी केली. रांगेत उभा असलेला प्रत्येक व्यक्ती बँकेत जमा असलेल्या पैशां पैशांबद्दल चिंतेत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, ठेवीदार या बँकेतून फक्त 5 लाख रुपये काढू शकतात. याशिवाय ग्राहकांना लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बँकेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. सध्या बँकेकडून केवळ लॉकरचे टोकन दिले जात असून ते देखील सर्वांना दिले नसल्याची  ठेवीदारांची तक्रार आहे. 

(नक्की वाचा- संतापजनक! वाळू माफियांकडून महसूल पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव)

बँकेवर निर्बंध का लादण्यात आले?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून बँक सतत तोट्यात होती. मार्च 2024 मध्ये बँकेला 22.78 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर 2023 मध्ये बँकेला 30.75 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पुढील 6 महिन्यांसाठी बँकेवर ही बंदी घातली आहे.  

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, "बँकेची सध्याची स्थिती पाहता बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँक कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक बाबींसाठी बँक खर्च करू शकते." 

(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)

बँकेवर कोणते निर्बंध असणार?

  • बँक आता नवीन कर्ज देऊ शकत नाही 
  • जुन्या कर्जाचे नूतनीकरणही करू शकत नाही
  • ग्राहकांना नवीन फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा इतर कोणतीही ठेव योजना उघडता येणार नाही  
  • बँकेत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवरही बंदी असेल 
  • ग्राहक त्यांच्या खात्यातून फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच पैसे काढू शकतात 
  • ग्राहक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू देखील बाहेर काढू शकतो
  • कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक बाबींसाठी बँक खर्च करू शकते