जाहिरात

Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा

सैराटमध्ये परश्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आर्चीचा खऱ्या आयुष्यातील परश्या कोण? हे जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना प्रचंड इच्छा असते, अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे.

Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा

'सैराट' चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. सैराटमधील आर्चीच्या भूमिकेने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या सोशल मीडिया पोस्टची, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सैराटमध्ये परश्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आर्चीचा खऱ्या आयुष्यातील परश्या कोण? हे जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना प्रचंड इच्छा असते, अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो, व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचे दिसत आहे.

स्वतः कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केला आहे. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असा कॅप्शन दिलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Krishnraj Mahadik : रिंकू राजगुरूशी लग्नाची चर्चा सुरू असलेले कृष्णराज महाडिक कोण आहे?

नक्की वाचा - Krishnraj Mahadik : रिंकू राजगुरूशी लग्नाची चर्चा सुरू असलेले कृष्णराज महाडिक कोण आहे?

काही नेटकऱ्यांनी,रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे वेगळंच वाटत आहे, म्हणत जोडा छान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर एका नेटकऱ्याने लग्नाचं मनावर घेतलेलं दिसतंय? असे म्हणत या व्हायरल फोटोवर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. थोडक्यात हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून रिंकूच्या मनात चाललंय काय? असा प्रश्न आता तिचे चाहते विचारू लागलेत.

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )

कोण आहेत कृष्णराज महाडिक?

कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे नेते, भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते युट्यूबर असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वतः उभे राहणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.