जाहिरात

Air India : एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी परवडणारा अन् सुखद प्रवास, इकॉनॉमी क्लासमध्ये नव्या सुविधेची घोषणा

एअर इंडियाने प्रवाशांना परवडणाऱ्या हवाई प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी इकॉनॉमी क्लासमध्ये नवीन 'बेसिक फेअर' सुविधा सुरू केली आहे.

Air India : एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी परवडणारा अन् सुखद प्रवास, इकॉनॉमी क्लासमध्ये नव्या सुविधेची घोषणा
  • एयर इंडिया ने घरेलू रूट्स पर पायलट प्रोजेक्ट के रूप में इकोनॉमी क्लास में नया ‘Basic Fare’ शुरू किया है.
  • Basic Fare में यात्रियों को 15 किलोग्राम चेक-इन और 7 किलोग्राम केबिन बैगेज की सुविधा मुफ्त मिलेगी.
  • इस किराए में मुफ्त चाय कॉफी मिलेगी, लेकिन भोजन शामिल नहीं होगा, भोजन के लिए अतिरिक्त शुल्क देना होगा.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Air India launched new ‘Basic Fare' in economy class : एअर इंडियाने प्रवाशांना परवडणाऱ्या हवाई प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी इकॉनॉमी क्लासमध्ये नवीन 'बेसिक फेअर' सुविधा सुरू केली आहे. हे तिकीट सध्या निवडक देशांतर्गत मार्गांवर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तीन इकॉनॉमी भाडे श्रेणींमध्ये चौथ्या श्रेणीची भर पडली आहे. व्हॅल्यू, क्लासिक आणि फ्लेक्स यांच्यानंतर आता 'बेसिक फेअर' नावाची एक नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे.

बेसिक फेअर विशेषत: कमी किमतीत प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा तयार आली आहे. यामध्ये अतिरिक्त सुविधा देण्यात आलेली नाही. या तिकिटाच्या किमतीत प्रवाशांना १५ किलोग्रॅम चेक इन बॅगेज आणि ७ किलोग्रॅम केबिन बॅगेजची परवानगी मिळेल. याशिवाय चहा-कॉफीसारख्या मूलभूत सुविधा मोफत दिल्या जातील, मात्र जेवणाचा यात समावेश नसेल. 


जेवणासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार...

याअंतर्गत ज्या प्रवाशांना जेवण हवं असेल त्यांनी उड्डाणाच्या २४ तासांपूर्वी अतिरिक्त शुल्क देऊन बुक करू शकतात. मेन्यूमध्ये शाकाहारी, मांसाहारी, जैन आणि मधुमेही रुग्णांसाठी वेगळ्या आहाराचा पर्याय असेल. जर कोणत्या कारणामुळे विमानाची वेळ बदलली किंवा प्रवाशाला दुसर्‍या विमानात शिफ्ट करण्यात आलं असेल तर बुक केलेलं भोजन नव्या विमानात ट्रान्सफर केलं जाईल. असं शक्य झालं नाही तर पूर्ण पैसे परत दिले जातील. 

एअर इंडियाने का सुरू केला हा पर्याय?

एअर इंडियाने स्पष्ट केलं की, Value, Classic आणि Flex तिकिटात आधी प्रमाणे मोफत भोजन आणि अन्य सुविधा दिल्या जातील. कंपनीचं म्हणणं आहे की, या निर्णयामागील उद्देश प्रवाशांना अधिक पर्याय देणं आणि प्रवाशांना आवश्यक असलेल्या सेवांसाठीच पैसे आकारणे हा आहे.

Basic Fare साठी बुकिंग कुठून कराल? 

सध्या Basic Fare चं बुकिंग एअर इंडियाची वेबसाइट, मोबाइल अॅप, कॉल सेंटर आणि एअरपोर्ट तिकीट  ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या अभिप्रायानंतर याचा अधिक विस्तार केला जाईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com