Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट

Air India Plane Crash: ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला?, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Raj Thackeray on Air India Plane Crash : एअर इंडियाच्या अहमदाबादमधील विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानाचा अपघात नेमका कसा झाला याचा शोध येत्या काळात घेतला जाईल. मात्र जे विमान अपघातग्रस्त झालंय त्या विमानाबद्दल अनेकांनी याआधी तक्रारी केल्या होत्या. हाच प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. 

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना." 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं", असं राज ठाकरे यांनी म्हटलं.  

जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं. ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला?, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले. 

Advertisement

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )

ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी. मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे वाचा, जमल्यास डॉक्युमेंट्री पण बघा, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं आहे. 

Advertisement

https://en.wikipedia.org/wiki/2013_Boeing_787_Dreamliner_grounding?utm_source=chatgpt.com

https://pbssocal.org/shows/frontline/clip/boeings-fatal-flaw-xenaq0?utm_source=chatgpt.com

https://en.wikipedia.org/wiki/Boeing_787_Dreamliner?utm_source=chatgpt.com

https://youtube.com/watch?v=rvkEpstd9os

https://wsj.com/business/airlines/boeings-quality-complaints-mount-as-another-whistleblower-comes-forward-396db79b?utm_source=chatgpt.com

(नक्की वाचा- Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय?)

न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खालील शब्द टाकलेत तर तुम्हाला संपूर्ण आर्टिकल वाचता येईल. 
https://nytimes.com
Report on Boeing 787 Dreamliner Batteries Assigns Some Blame for Flaws” by Jad Mouawad (published December 1, 2014)

वॉलस्ट्रीट जर्नलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर हे शब्द टाकलेत तर तुम्हाला याबद्दल पूर्ण वाचता येईल. 
https://wsj.com Production Problems Spur Broad FAA Review of Boeing Dreamliner Lapses WSJ