Ajit Pawar Death:'पंगतीत सोबत, मग चौकशीबाबत गप्प का?' तटकरे-पटेल यांच्या 'सायलेन्स'वर कराळे गुरुजींचा मोठा वार

Ajit Pawar Death Mystery: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे गुरुजी यांनी या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Ajit Pawar Death Mystery: 'NDTV मराठी' शी  बोलताना कराळे यांनी अनेक खळबळजनक सवाल उपस्थित केले आहेत.
मुंबई:

Ajit Pawar Death Mystery: माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच आता या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे गुरुजी यांनी या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त करत थेट अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. 

पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर 'NDTV मराठी' शी  बोलताना कराळे यांनी अनेक खळबळजनक सवाल उपस्थित केले आहेत. या अपघातामागे काही घातपात तर नाही ना, अशी शंका उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचा चेंडू सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या कोर्टात टाकला आहे.

तटकरे आणि प्रफुल पटेल शांत का?

नितेश कराळे यांनी थेट सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजित पवार यांच्यासोबत सत्तेत आणि पक्षात खांद्याला खांदा लावून चालणारे हे नेते आता गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला. 

(नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash: 2 मिनिटांत खेळ बदलला! रोहित पवारांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा )

अजित पवार गटाच्या नेत्यांनी या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करायला हवी होती. जर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी चौकशीची मागणी लावून धरली असती, तर यंत्रणांवर दबाव वाढला असता आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यास मदत झाली असती, असे मत कराळे यांनी व्यक्त केले आहे. सत्तेतील सहकारी असूनही हे नेते या विषयावर आक्रमक का होत नाहीत, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Advertisement

अपघाताच्या वेळेबाबत व्यक्त केला संशय

या घटनेच्या संदर्भात बोलताना कराळे गुरुजी म्हणाले की, अजित पवारांचा व्हिडिओ समोर येण्यापूर्वीच मी या विषयावर व्हिडिओ केला होता. त्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसाला ही घटना केवळ अपघात वाटत होती, परंतु त्यानंतर समोर आलेल्या गोष्टी अत्यंत संशयास्पद आहेत. या प्रकरणामधून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. 

( नक्की वाचा : Ajit Pawar Death: ऐनवेळी विमान का बदलले? एअर होस्टेस पिंकी माळीच्या पालकांनी उघड केली पडद्यामागची हालचाल )

सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी एखाद्या त्रयस्थ आणि निष्पक्ष यंत्रणेमार्फत करण्यात यावी. हा खरोखरच तांत्रिक कारणांमुळे झालेला अपघात असेल, तर आम्ही तसे स्वीकारायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

Advertisement

निलंबित वैमानिकाचा मुद्दा आणि सत्तेचे राजकारण

कराळे यांनी विमान चालवणाऱ्या वैमानिकाबद्दलही गंभीर माहिती समोर आणली आहे. ज्या वैमानिकाला दोन वेळा निलंबित करण्यात आले होते, तोच वैमानिक अजित पवारांच्या विमानाचा पायलट कसा काय असू शकतो, असा सवाल त्यांनी विचारला. यामागे नक्की कोणाचे आदेश होते याची चौकशी झाली पाहिजे. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा अंतिम निर्णय 12 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची चर्चा होती. 

पक्ष विलीन झाला असता तर ताकद वाढली असती, पण सत्तेत वाटेकरी नको असे कोणालाही वाटू शकते, असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला आहे. सत्तेचा मोह कुणाला नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्तेतील अंतर्गत कलहाकडेही बोट दाखवले आहे.

Advertisement

पक्षाचा ताबा आणि मंत्रिपदाचा पेच

शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर कराळे यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. जर पक्षाचा ताबा पुन्हा शरद पवार यांच्याकडे आला, तर सत्तेत राहायचे की नाही याचा अंतिम निर्णय तेच घेतील. जर त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर अनेकांना आपली मंत्रिपदे सोडावी लागतील. सत्तेच्या या खेळात कोणाला काय हवे आहे, हे आता स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इथे पाहा संपूर्ण VIDEO