जाहिरात

Ajit Pawar Death: ऐनवेळी विमान का बदलले? एअर होस्टेस पिंकी माळीच्या पालकांनी उघड केली पडद्यामागची हालचाल

Ajit Pawar Plane Crash: या दुर्घटनेत प्राण गमावलेली फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या पालकांनी देखील गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar Death: ऐनवेळी विमान का बदलले? एअर होस्टेस पिंकी माळीच्या पालकांनी उघड केली पडद्यामागची हालचाल
Ajit Pawar Plane Crash: एअर होस्टेस पिंकी माळीच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता अधिकच गुढ बनू लागले असून यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता या दुर्घटनेत प्राण गमावलेली फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या पालकांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा दावा पिंकीच्या आई-वडिलांनी केला असून प्रशासनासमोर काही टोकदार प्रश्न उभे केले आहेत.

काय म्हणाले पिंकी माळीचे वडील?

पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी यांनी या प्रकरणातील एका महत्त्वाच्या बदलाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. पिंकीने यापूर्वी अजित पवार यांच्यासोबत चार वेळा प्रवास केला होता, त्यावेळी ते विमान काळ्या आणि करड्या रंगाचे होते. मात्र, अपघाताच्या दिवशी अचानक पांढऱ्या रंगाचे विमान का वापरण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रवासाच्या वेळी विमानाचा रंग बदलण्यामागे नेमके काय कारण होते, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash: 2 मिनिटांत खेळ बदलला! रोहित पवारांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा )

ट्रॅफिकचे कारण अजब

विमान अपघाताच्या दिवशी केवळ विमानच नाही, तर पायलट देखील ऐनवेळी बदलण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. यावर पिंकीच्या पालकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सकाळी 6 वाजता मुंबईत कोणत्या भागात ट्रॅफिक असते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. पायलटला पोहोचायला उशीर होण्याचे कारण देऊन ऐनवेळी दुसरा पायलट नियुक्त करणे आणि त्याच वेळी विमानही बदलणे या गोष्टी संशयास्पद वाटत असल्याचा दावा पिंकीच्या आईने केला आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं )

रोहित पवार यांच्या आरोपांना दुजोरा

आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत हा अपघात नसून घातपात असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानाला आता पिंकी माळीच्या कुटुंबाने पाठिंबा दिला आहे. अजित पवार ज्या विमानातून बारामतीला निघाले होते, त्या विमानाबाबत घडलेल्या या सर्व घडामोडी पाहता हा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत या कुटुंबाने व्यक्त केले आहे. या गंभीर आरोपानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death : 'उद्या भेटू' म्हणाली अन् काही वेळातच...अजित पवारांच्या विमानातील एअर होस्टेसची करुण कहाणी )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com